ऑनलाईन वीजबील भरणा अधिकृत एजन्सीकडेच करावा : महावितरणचे आवाहन

Date:

मुंबई, : वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबील भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारेच करावा तसेच ऑनलाईन वीजबील भरताना एखाद्या एजन्सीबाबत शंका आल्यास शहानिशा करुन नंतरच वीजबील भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

        महावितरणने नियुक्त केलेले अधिकृत ऑनलाईन वीजबील भरणा केंद्र महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. या केंद्राद्वारे वीजबिलांचा भरणा केला जातो. परंतु काही ठिकाणी महावितरणचे परवानगी नसलेले अनधिकृत ऑनलाईन वीजबील भरणा केंद्रे वीजबिलांचा भरणा करून घेतात त्या पैशांचा भरणा महावितरणकडे करीत नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृत केंद्रांमुळे ग्राहकाने वीजबील भरूनही त्याची नोंद महावितरणकडे होत नाही. त्यामुळे संबंधित वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जातो त्याचा त्रास ग्राहकांना होतो.

ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या ग्राहकांनी वीजबील भरल्यावर त्याची पावती अवश्य घ्यावी, पावतीवरील ग्राहक क्रमांक, पावती क्रमांक बघून घ्यावा. तसेच ऑनलाईन वीज बील भरताना आवश्यकता वाटल्यास खात्री करण्यासाठी मुख्य कार्यालय, मुंबई येथे 022-26478246 या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...