दुष्काळग्रस्त बीड मध्ये फुलले नंदनवन – मुंबईच्या माझगाव डॉक कंपनी व पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फुलवला स्वर्ग

Date:

पाटोदा –
भीषण दुष्काळ आणि मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी समस्या व परिस्थितीवर मात करण्यासाठी  बीड च्या  पाटोदा परिसरातील आठ गावांमध्ये गतवर्षी मुंबईच्या माझगाव डॉक कंपनी व पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुंक्त प्रयत्नातून कंपन्यांच्या सामाजिक बांधीलकी (सी एस आर )च्या उपक्रमांतर्गत  सुरु करण्यात आलेल्या पर्यावरण व शेतीआधारित उपजीविका प्रकल्पाला २ मे रोजी वर्षपूर्ती होत असतानाच चक्क एप्रिल महिन्यातच शेतकऱ्यांनी सर्वत्र हिरवळ पसरवली असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी फुलविलेल्या या नंदनवनाचे प्रशासन व परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षी मुंबई च्या माझगाव  डॉक शिप् बिल्डर्स लिमिटेड (एम डी एल) कंपनी चे चेअरमन निवृत्त रिअर एडमिरल आर के श्रावत व पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. महेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून पाटोदा तालुक्यातील पारनेर परिसरातील आठ गावांमध्ये भीषण दुष्काळात होरपळनाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे व पर्यावरणाचा समतोलही साधला जावा या उदात्त हेतूने मुंबई येथील माझगाव  डॉक शिप् बिल्डर्स लिमिटेड मुंबई, (एम डी एल) आणि पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्था, पुणे (समाजकार्य महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी (सी एस आर) उपक्रमांतर्गत पाटोदा तालुक्यातील पारनेर परिसरातील गावामध्ये दि.२ मे  रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन एम डी एल चे चेअरमन, निवृत्त रिअर एडमिरल आर के श्रावत यांच्या हस्ते करण्यात आले  होते व त्यानंतर पारनेर व परिसरातील गावामध्ये सार्वजनिक तसेच वैयक्तिक शेतकर्याच्या शेतीमध्ये उपजीविका आधारित वृक्षारोपण करणे, परिसरातील गावकरी व शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी विहिरींचा आणि तलावांचा गाळ काढणे अशा विविध कामना सुरुवात करण्यात आली होती. गावातील ग्रामस्थ व परिसरातील गावांना शेती आधारित शाश्वत उपाययोजना, शेती आधारित उत्पन्न व रोजगार निर्मितीची संधी निर्माण करणे व  शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थिरता आणून शेतकऱ्यांना सक्षम बनविणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे फलित वर्षपूर्ती होत असतानाच दिसून येत आहे.
कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रकल्प संचालक प्रा महेश ठाकूर, प्रा.चेतन दिवाण, प्रकल्प समन्वयक चयन पारधी व माझगाव डॉक चे जालिंदर यादव यांनी
नुकतीच वृक्षारोपण केलेल्या  सर्व ठिकाणांना तसेच  फळझाडे देण्यात आलेल्या वयक्तिक शेतकरी लाभार्थीना भेटी देऊन वर्षभराच्या वृक्ष लागवडीचा आढावा घेण्यात आला.
गतवर्षी पाटोदा तालुक्यातील पारनेर, कुंटेवाडी,शिखरवाडी,नागेशवाडी, गवळवाडी, येवलेवाडी वानेवाडी व धनगर जवळका या आठ गावांमधील १०४२ ( एक हजार बेचाळीस) शेतकऱ्यांना  उपजीविकेचे  साधन म्हणून आंबा, चिकू, सीताफळ,शेवगा व चिंच अशा ३३२०७ (तेहेत्तीस हजार दोनशे सात ) फळझाडांचे वितरण करण्यात आले होते.तसेच या गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणीही वृक्षलागवड करण्यात आली होती. कर्वे समाज सेवा संस्थेचे राजू घाडगे, अमोल दडस, संजय यादव यांनी सर्व वृक्षांच्या वाढ व संवर्धनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत जवळ जवळ ८५ % (पंच्याऐंशी टक्के ) झाडे जगवून दाखविली आहेत. एकीकडे शासनामार्फत वृक्षारोपण करण्यात आलेल्या व आढाव्या अभावी जळून गेलेल्या झाडांची दुरावस्था व दुसरीकडे माझगाव डॉक व कर्वे समाज सेवा संस्थेच्या “टीम” च्या उत्कृष्ठ नियोजन व योग्य अंमलबजावणी च्या जोरावर शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात बीड मध्ये सर्वत्र हिरवळ फुलवून आणली आहे हे प्रशंसनीय आहे. पाटोद्याचे नायब तहसीलदार गणेश जाधव, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा. डॉ. दीपक वालोकर , प्रा. महेश ठाकूर , प्रा. चेतन दिवाण, चयन पारधी, जालिंदर यादव, महाडेश्वर, कदम, पारनेर गाव च्या सरपंच सौ औटे आदींनी सर्व शेतकऱ्यांचे कौतुक केले असून गतवर्षी झालेल्या उत्कृष्ठ कामामुळे जालिंदर यादव यांनी आणखी ८ ते १० शेतकऱ्यांना शेततळे देणे, विहिरी व तलावातील गाळ काढणे, शेतकऱ्यांना स्प्रिंकलिंग वाटप करणे अशा अनेक जलसंधारनाच्या कामाना मदत करण्याचे ठरविले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.
गतवर्षी सुरु झालेल्या या  वैशिष्ठ्य पूर्ण कामाचा आढावा घेतला असता यावर्षी बहुतांशी ठिकाणी शिवारांमध्ये हिरवळ व मार्च मध्येच संपणाऱ्या विहिरी व तलावाना अद्यापही असणारे पाणी आढळून आले आहे.
आर के श्रावत यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अमलबजावणी वं  यशस्वितेसाठी एम डी एल चे संचालक श्री दास, प्रदीप महादेश्वर, जालीन्दर यादव, श्री कदम आणि कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) दिपक वालोकर प्रा महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवान, चयन पारधी, राजू घाडगे, अमोल दडस, संजय यादव, संबंधित गावकरी व शेतकरी हे प्रयत्नशील आहेत. .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...