Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाऊस येण्यापुर्वीच तब्बल सहा तास आधी दिला कावळ्याने इशारा …अर्धा तास केली लाईट गुल…

Date:

 

पुणे : पाऊस येण्यापुर्वीच लाईट जाते असे वाटणे साहजिक आहे . पण पाऊस आला संध्याकाळी आणि लाईट गेली अगोदरच दुपारी … होय असे झाले आहे पण हा प्रताप ना पावसाचा;  ना महावितरण च्या  त्रुटीचा …मग ?      हा प्रताप केला आहे एका कावळ्याने … होय कावळ्याने …पाऊस येण्यापुर्वीच तब्बल सहा तास आधी दिला कावळ्याने इशारा.. असे हि याबाबत गमतीने म्हटले जाईल … अर्थात गमतीचाच भाग, गमतीचे हेडिंग  ….पण खरे काय घडले ते वाचा पुढे … 

महापारेषणच्या पर्वती उपकेंद्रात  बिघाड;पर्वती, पद्मावती, रास्तापेठ, कोथरूडपरिसरात 30 मिनिटे वीज खंडित

महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातील सीटीवर (करंट ट्रान्सफॉर्मर) कावळ्याने चोचीत आणलेला लोखंडी तारेचा तुकडा पडून बिघाड झाल्याने महावितरणच्या पर्वती, पद्मावती, कोथरूड व रास्तापेठ परिसरात बुधवारी (दि. 01) सुमारे 30 मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्गात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास कावळ्याने चोचीत आणलेल्या मांसाच्या तुकड्यासह लोखंडी तारेचा तुकडा नेमका सीटीवर (करंट ट्रान्सफॉर्मर) पडला. त्यामुळे वीजपुरवठ्याची स्वयंचलीत यंत्रणा बंद पडल्याने पर्वती 220 केव्ही उपकेंद्रासह रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्गाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे धनकवडी, सिंहगड रोड, सहकारनगर, पेशवेपार्क, स्वारगेट, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, गुलटेकडी, नवी पेठ, सदाशिव पेठ, गंजपेठ, पंचवटी, बालाजीनगर, मुकुंदनगर, धायरी, भवानी पेठ, चव्हाणनगर, कात्रज, जुनी पर्वती, पद्मावती, कसबा पेठ, रास्तापेठ, कोथरूड परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

दरम्यान, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. बबन शिंदे यांनी महापारेषणच्या पर्वती उपकेंद्रा ला भेट देऊन पाहणी केली. महापारेषणकडून उपकेंद्गातील वीजपुरवठा सुरु करण्यासाठी त्वरेने प्रयत्न करण्यात आले आणि सर्व परिसरातील वीजपुरवठा सकाळी 11.33 वाजता  पूर्ववत झाला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...