पुणे– खासदार वंदना चव्हाण यांनी जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांच्या सोबत पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटला भेट देऊन तेथील पाहणी केली. दळवी हॉस्पिटलच्या डॉ. माधुरी पवार यांनी हॉस्पिटलची सर्व माहिती दिली.
महानगरपालिकेचे अद्यावत सोयीने उपलब्ध असलेले दळवी हॉस्पिटल अनेक गरजू रुग्णांना उपयुक्त ठरत आहे.
रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी येथील डॉक्टर, रुग्णसेविका व कर्मचारी वर्ग हे अत्यंत प्रयत्नशील आहेत
अशी भावना वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली, तसेच भविष्यात हॉस्पिटल आधुनिक व अद्यवत तंत्रज्ञानयुक्त असावे यासाठी खासदार निधी देण्यासाठी देखील आपण तयार असल्याचे यावेळी खासदार वंदना
चव्हाण यांनी स्पष्ट केले.
निर्भयाच्या घटनेनंतर पिडीत /अत्याचारीत महिलांना एकाच ठिकाणी आसरा, पोलीस डेस्क, वैदकीय व कायदेशीर सल्ला यांसारख्या सुविधांसोबत २४ तास कार्यान्वित असलेली हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध
करून देण्यासाठी “One-Stop Centre” ची सुरुवात करण्यात आली. आज दळवी हॉस्पिटल येथील परिसरात अश्या स्वरूपाचे सेंटर कार्यरत आहे. या सेंटरला भेट देऊन अधिकची माहिती खा. चव्हाण यांनी घेतली,
यावेळी या सेंटरमधून अधिक प्रभावी व कार्यक्षमपणे काम चालावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील चव्हाण यांनी नमूद केले.