उपासमारीची वेळ आलेल्या 22 आदिवासी बंधु-भगिनींना खासदार संजय काकडेंची मदत
पुणे, दि. 27 मार्च :* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश लॉकडाऊन असताना पुणे शहराजवळील कोरेगाव भीमा येथे उपासमार होत असलेल्या 22 आदिवासी नागरिकांच्या मदतीला राज्यसभा खासदार संजय काकडे धावून गेले. खासदार संजय काकडे यांच्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असल्याने कंपन्या व उद्योगधंदेही बंद झालेत. रोजगारासाठी शेकडो मैल दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अलंकूर गावातून 22 आदिवासी पुरुष-महिला पुणे शहराजवळील कोरेगाव भीमा भागातील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आले होते. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद झाल्या आणि त्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली. अशातच ही बातमी आदिवासी समाजाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांना समजली आणि त्यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांना याविषयी सांगितले. कोणताही विलंब न करता खासदार संजय काकडे यांनी आज या आदिवासी भागातील नागरिकांना मदत पोहोचवून माणुसकीचं अनोखं दर्शन घडविले. खासदार संजय काकडे यांच्या या मदतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.
खासदार संजय काकडे यांनी पुण्यातून 250 किलो अन्नधान्य आणि प्रत्येकी 2 हजार रुपये मदत या 22 जणांना केली. खासदार संजय काकडे यांचे स्वीय सहाय्यक राहुल शर्मा ही मदत घेऊन कोरेगाव भीमा येथे गेले. त्या गावच्या तलाठी यांच्या मदतीने ही मदत संबंधीत आदिवासी बंधु-भगिनींना देण्यात आली. तसेच, सदर कामगार राहात असलेल्या घराचे घरभाडे मालकाने घेऊ नये म्हणूनही व्यवस्था करण्यात आली. यानंतरही काही मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासन यावेळी आदिवासी बंधु-भगिनींना देण्यात आले.
या कामगारांनी गावाकडे जाण्याची व्यक्त केली आहे. घरातील वृद्ध माणसांची या स्थितीत देखभाल करण्यासाठी गावाकडे जायचे असल्याचे ते म्हणाले. परंतु, कोरोनामुळे देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे कामगारांना त्यांच्या गावाकडे जाता येत नाही.