वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

Date:

पुणे – आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, पहिल्याच सभेत वित्तीय समिती रद्द करा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली.यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले कि,वित्तीय समितीमुळे शहराचे काही नुकसान झाले असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. समितीच्या कामाचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवला जाईल.

सुतार म्हणाले कि, प्रशासनाचा कल विकास कामे करण्यापेक्षा अडवण्याकडे जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने वित्तीय समिती, निविदा समिती अशा समित्या तयार केल्या आहेत.अशा सगळ्या गोष्टी मुळे विकासावर परिणाम होतो आहे अनेक विकासकामे रेंगाळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खुलासा करावा. अशी मागणी सुतार यांनी  केली. त्यानंतर धीरज घाटे म्हणाले कि, वित्तीय समिती कोविड काळात तयार करण्यात आली होती. सद्यस्थितीत समितीची आवश्यकता नसेल तर निर्णय करून बरखास्त करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले,  प्रशासक काळात वित्तीय समिती होती. मात्र आता स्थायी समिती आणि मुख्य सभा अशा दोनच कराव्यात. कॉंगेस नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले, स्थायी समिती असताना वित्तीय समितीची काय आवश्यकता आहे? हा स्थायी समितीला समांतर समिती करणे हा स्थायी समितीचा अपमान आहे.

यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, वित्तीय समिती बाबत मी स्वतः अभ्यास करून काही नुकसान झाले का यावर विचार करतो. स्थायी समितीत प्रशासनाचे डॉकेट जाते. वित्तीय समिती मुळे विकासकामे कशी करायचे ते कळते. त्यानुसार आम्हाला काम करण्याची दिशा मिळते. मात्र समितीमुळे शहराचे नुकसान होत असेल तर समिती बरखास्त करू. समिती असण्याचा आम्ही आग्रह धरत नाही. शहराचे नुकसान होत असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. याबाबत आम्ही पुढील मुख्य सभेत समितीने केलेल्या कामाचा अहवाल देतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिढी घडविण्याच्या कार्यात सहकार्य करा:ॲड. निमल शिर्के-सामंत यांचे नगरसेविकांना आवाहन

पुणे : समाजमाध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग रंगभूमीपासून दुरावत आहे. अशाही परिस्थितीत...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...