शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Date:

संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प; न्यायालयीन शपथेसाठी संविधानाचा पर्याय स्वीकारण्याचे मत

पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त शिवसेना भवन, पुणे येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.सोनाली लांडगे यांनी घटनेच्या ऊद्देशिकेचे वाचन केले.

भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असून, संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकाच्या जीवनात रुजणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करून ती समाजात अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी आपली मते व्यक्त करताना डॅा.नीलम गोर्हे म्हणाल्या की हिंदूह्रदयसम्राट मा. ठाकरे यांचे मत होते की न्यायालयात साक्ष देताना किंवा शपथ घेताना धार्मिक ग्रंथांची शपथ घेण्याऐवजी भारतीय संविधानाची शपथ घेण्याची पद्धत घेण्यात यायला हवी मत मांडले. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असून संविधान हे सर्व नागरिकांसाठी समान आणि सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संयोजन पूजा रावेतकर- महिला संपर्कप्रमुख पुणे शहर, शिवसेना कार्यालय सचिव संदिप शिॅदे सुधीर कुरुमकर-शिवसेना कामगार सेना, यांनी केले होते व ऊपस्थितात एकनाथ ढोले, मीनल धनवटे, गायत्री भागवत, सोनाली लांडगे, अक्षता धुमाळ, महेंद्र जोशी, मिलिंद आहिर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मैदाने आणि उद्याने महापालिकेनेच विकसित करावी

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे...

संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्न

संविधानिक मूल्यांचा जागर; विद्यार्थी, सामाजिक संघटना व नागरिकांचा उत्स्फूर्त...

भाजपा पुणे शहर ‘उद्योग आघाडी’च्या अध्यक्षपदी मंदार देवगांवकर यांची निवड

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर 'उद्योग आणि...

पुणे: ‘पेन्शनरांचे शहर’ ते ‘क्राईम सिटी’ होणे चिंताजनक!

शहरात बंदुका आणि कोयते येतात कुठून? अवैध शस्त्रांच्या पुरवठा...