संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्न

Date:

संविधानिक मूल्यांचा जागर; विद्यार्थी, सामाजिक संघटना व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, दि. २६ : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
संविधान रॅलीला समाज कल्याण आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे, विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, बार्टीचे उपायुक्त रवी कदम, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते.

रॅलीच्या प्रारंभी बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. समाज कल्याण आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संविधान रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थी, पुणे शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा संदेश बॅनर, पोस्टर्स व जनजागृतीपर फलकाच्या माध्यमातून दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा संदेश देत रॅलीने नागरिकांमध्ये संविधानाविषयी जनजागृती केली.

ही रॅली भिडे वाडा, बुधवार पेठ येथून लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक आणि जुनी जिल्हा परिषद या मार्गाने ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे स्टेशन येथे पोहोचली. याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर सहायक आयुक्त श्री. लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. समाज कल्याण, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे आणि बार्टीच्या निबंधक श्रीमती सुचिता शिंदे यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये विद्यमान उपमहापौर वाडेकर माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे, विभागप्रमुख बबन जोगदंड तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड यांच्यासह समाज कल्याण विभाग आणि बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महार रेजिमेंटचे माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मैदाने आणि उद्याने महापालिकेनेच विकसित करावी

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे...

शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प; न्यायालयीन शपथेसाठी संविधानाचा पर्याय...

भाजपा पुणे शहर ‘उद्योग आघाडी’च्या अध्यक्षपदी मंदार देवगांवकर यांची निवड

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर 'उद्योग आणि...

पुणे: ‘पेन्शनरांचे शहर’ ते ‘क्राईम सिटी’ होणे चिंताजनक!

शहरात बंदुका आणि कोयते येतात कुठून? अवैध शस्त्रांच्या पुरवठा...