पुणे: ‘पेन्शनरांचे शहर’ ते ‘क्राईम सिटी’ होणे चिंताजनक!

Date:

शहरात बंदुका आणि कोयते येतात कुठून? अवैध शस्त्रांच्या पुरवठा साखळीचा पोलिसांनी छडा लावावा; हेमंत आबा बागुल यांची मागणी

पुणे : एकेकाळी ‘पेन्शनरांचे शहर’ आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराची ओळख आता ‘क्राईम सिटी’ म्हणून निर्माण होत असेल, तर ही प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेची बाब आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी, बंदुका आणि कोयत्यांचा खुलेआम वापर करून निर्माण केली जाणारी दहशत आणि अवैध शस्त्रांच्या वाढत्या उपलब्धतेमागील नेटवर्क यांचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी युवा सेनेचे पुणे महानगर प्रमुख हेमंत आबा बागुल यांनी केली आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बंदुका आणि कोयते नेमके येतात कुठून? या घातक शस्त्रांचा पुरवठा कोण करतो? त्यांची निर्मिती कुठे होते आणि या संपूर्ण अवैध व्यवसायामागे कोणती टोळी किंवा यंत्रणा कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे.

शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः वस्तीच्या परिसरांमध्ये बंदुका आणि कोयत्यांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांमध्ये बंदुका सहज उपलब्ध होत असल्याच्या चर्चा आहेत. जर इतक्या कमी किमतीत शहरात घातक शस्त्रे उपलब्ध होत असतील, तर त्यामागील पुरवठा साखळी किती व्यापक असेल, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे, असे बागुल यांनी स्पष्ट केले.

केवळ गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त करून प्रश्न सुटणार नाही. ही शस्त्रे तयार कुठे होतात, शहरात कोणत्या मार्गाने आणली जातात, त्यांची विक्री कोण करते आणि या अवैध नेटवर्कला कोणाचे पाठबळ आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर त्यांना तातडीने जामीन मिळत असल्याच्या घटनांचाही आढावा घेण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी कायदेशीर बाजू प्रभावीपणे मांडून दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

वाढते शहरीकरण; पण कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन कुठे?

रोजगार, व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात येत आहेत. शहराचा विस्तार आणि विकास ही स्वागतार्ह बाब असली, तरी वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत कायदा व सुव्यवस्थेचे नियोजनही सक्षम असणे आवश्यक आहे. शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांना शहरातील संवेदनशील भागांमध्ये अवैध शस्त्रांच्या हालचालींबाबत माहिती मिळत असते, अशी नागरिकांची भावना आहे. असे असताना या माहितीच्या आधारे ठोस कारवाई का होत नाही? गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर भूमिका कोण घेणार? याची उत्तरे प्रशासनाने दिली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी तातडीने कराव्यात या उपाययोजना

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ बैठका आणि आश्वासनांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत बागुल यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.

  1. शहरात अवैध बंदुका आणि कोयत्यांचा पुरवठा करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.
  2. अवैध शस्त्रांची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी.
  3. गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या वस्त्या आणि परिसरांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवावी.
  4. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून जामीन प्रक्रियेत कायदेशीर विरोध प्रभावीपणे नोंदवावा.
  5. गुन्हेगारांना शस्त्रे पुरवणाऱ्या आर्थिक आणि संघटित गुन्हेगारी साखळीचा तपास करावा.
  6. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांची गस्त आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करावी.

पुणेकरांच्या जीविताचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर शहरातील गुन्हेगारी आणखी फोफावण्याची भीती आहे. पुण्याला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी. पुण्याची ओळख पुन्हा एकदा सुरक्षित, सांस्कृतिक आणि सुसंस्कृत शहर म्हणून निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन हेमंत आबा बागुल यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्हा न्यायालयाची सुरक्षा ‘रामभरोसे’!

७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद; मेटल डिटेक्टर धूळखात, सीमाभिंतीचे...

‘जरा याद करो कुर्बानी…’; बालगंधर्व चौकात २६/११ च्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

पोलीस मित्र संघटनेचा उपक्रम; शहीद पोलीस अधिकारी, जवान आणि...

सौर ऊर्जा खरेदीचा करार २५ वर्षांचा, साठवणुकीचा मात्र ४० वर्षांचा! फडणवीस सरकारचे उरफाटे धोरण – मुकुंद किर्दत

कर्जत-भीमाशंकर येथील टोरेंट पॉवरचा प्रकल्प महावितरणसाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याचा...

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला

-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव मोहन जोशी पुणे : स्व.यशवंतराव चव्हाण...