📍 शासकीय विश्रामगृह, पुणे
पुणे, : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आज पुणे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे बैठकीसाठी उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
यावेळी सुनेत्रावहिनींनी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
नागरिकांची मोठी गर्दी असतानाही प्रत्येकाची समस्या जाणून घेण्याची आणि त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याची सुनेत्रावहिनींची कार्यपद्धती पाहून उपस्थितांना लोकनेते अजितदादा पवार यांच्या कामाच्या शैलीची आठवण झाली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांची कामे मार्गी लावण्याची दादांची कार्यशैली आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या कामातून अनुभवायला मिळत असल्याची भावना यावेळी नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.

