माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरणजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना धनादेश प्रदान

Date:

पुणे, दि. ६ : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या पाल्यांना एकूण १० लाख २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आयोजित कार्यक्रमात १० लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यामध्ये माजी सैनिकांना स्वयंरोजगारासाठी ३ लाख रुपये, सैन्यसेवेत असताना ४६.०४ टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकास २५ हजार रुपये, सदनिका खरेदीसाठी पाच लाभार्थ्यांना एकूण ४ लाख ५० हजार रुपये, अधिकारी शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास १ लाख रुपये, परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास १ लाख रुपये, तर सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास ५० हजार रुपये अशी मदत देण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांच्या कुटुंबीयांना, माजी सैनिकांना, त्यांच्या विधवांना व आश्रितांना आर्थिक आधार देण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येतो.

तरी नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने योगदान देऊन माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
0000

mymarathi.net चे सर्व वाचक, दर्शक स्नेही ,फौलोअर्स, जाहिरातदार ज्यांच्या पाठींब्यावर १४ वर्षे मराठी न्यूज देण्यासाठी कोणत्याही बड्या भांडवलदारा शिवाय आम्ही स्वतंत्रपणे अविरत वाटचाल सुरु ठेवली आहे. अशा सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा………







SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...

पुणे विभागात एफडीएचा दणका! ५.२ टन खाद्यपदार्थ जप्त; २० आस्थापनांवर कारवाई

१४.८७ लाखांचा साठा जप्त; ५५९ किलो मिठाई व खाद्यपदार्थ...