MPSC आंदोलनाचा नववा दिवस:पहाटे प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही

Date:

पुणे-पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे.

ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके अशी उपोषण मागे घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सलग सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावत होती. त्यांच्या किडनीवर याचा गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ नको, या भूमिकेतून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.

ज्येष्ठांच्या आवाहनाचा मान राखून अखेर या तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. आमदार विश्वजित कदम आणि विराज शिंदे या चिमुकल्याच्या हस्ते दूध पिऊन या विद्यार्थ्यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली. मात्र, विद्यार्थ्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी कालच आंदोलकांना एस. एम. जोशी पूल मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाही, या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत.

अध्यक्षांची विकेट घेतल्याशिवाय थांबणार नाही – रोहित पवार
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि लोकसेवा आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण सोडले आहे. पण, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी हा सत्याग्रह सुरूच राहील. जोपर्यंत या भ्रष्ट अध्यक्षांची आपण विकेट घेत नाही, तोपर्यंत या आंदोलनाची सांगता होणार नाही.” विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related