विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील

Date:

पुणे-दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे.

या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.

सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.

आळंदी नगरपरिषद, आळंदी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेच्या कचरा डेपोची दीड एकर जमीन भूमाफियांनी हडपल्याचा आरोप

उरुळी देवाची येथील स. नं. ३२ मधील प्रकरण; बनावट...

डेक्कन ते गांधी भवन दरम्यान शांती मार्च; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

‘गांधी विचार हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’चा संदेश;अहिंसा, सामाजिक सलोख्याच्या...

अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती

'ए.आय.च्या युगातही चित्रकारांच्या रेषांचे महत्व कायम' -प्रा. राहुल बोरावके पुणे-कला क्षेत्रात...