सेवा सेतू अभियान : १७५० वीजग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती १७२ ठिकाणी ‘किऑस्क’; ३४६३ नागरिकांनी दिली भेट

Date:

पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सेतू अभियाना’ला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात १७२ ठिकाणी उभारलेल्या किऑस्कला आतापर्यंत तब्बल ३४६३ नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली, तर १७५० ग्राहकांनी छतावरील सौर प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड या महानगरांत विविध वॉर्डमध्ये, तर ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सेवा सेतू अभियानांतर्गत महावितरणने किऑस्क उभारले आहेत. या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अनुदान व आर्थिक लाभ, सौर संचाची क्षमता, अंदाजित खर्च, कर्ज सुविधा तसेच अधिकृत सौर कंत्राटदारांबाबत माहिती किऑस्कवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सूर्यघर योजनेंतर्गत १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार, तर ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या आत आहे, अशा ग्राहकांना स्मार्ट योजनेतून लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार, अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प घराच्या छतावर लावता येतो. १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सरासरी १२० युनिट वीज दरमहा तयार होते. यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होण्यास मदत होते.

महानगरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून सर्वाधिक ७२४ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ गणेशखिंड शहर मंडलातून ६१४ व रास्तापेठ शहर मंडलातून ४१२ अर्ज सौरप्रकल्पासाठी प्राप्त झाले आहेत. हे किऑस्क १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी जवळच्या किऑस्कला भेट देऊन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील

पुणे-दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी...

डेक्कन ते गांधी भवन दरम्यान शांती मार्च; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

‘गांधी विचार हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’चा संदेश;अहिंसा, सामाजिक सलोख्याच्या...

अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती

'ए.आय.च्या युगातही चित्रकारांच्या रेषांचे महत्व कायम' -प्रा. राहुल बोरावके पुणे-कला क्षेत्रात...