सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांचे पुण्यात पदार्पण; सोपानबागमध्ये अत्याधुनिक YKBI स्टुडिओ
पुणे, दि. १ ऑक्टोबर : देशातील प्रसिद्ध पिलाटेस तज्ज्ञ आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी पुण्यात ‘यास्मिन कराचीवाला बॉडी इमेज’ (YKBI) या नव्या स्टुडिओची सुरुवात केली आहे. कॅलिस्थेनिक्स जिम ‘मसल बार’च्या भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या या स्टुडिओमध्ये पिलाटेस आणि कॅलिस्थेनिक्स या दोन्ही प्रकारच्या व्यायामपद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. Pune YKBI Studio
फिटनेस क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या यास्मिन कराचीवाला या देशातील पहिल्या BASI प्रमाणित पिलाटेस प्रशिक्षक म्हणून ओळखल्या जातात. आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि हृतिक रोशन यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. फिटनेसविषयक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. Pune YKBI Studio
“पुण्यात मसल बारसोबत भागीदारी करून YKBI सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. पिलाटेस अधिकाधिक पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, कार्यालयीन काम करणाऱ्यांपासून गृहिणी आणि खेळाडूंपर्यंत प्रत्येकाला पिलाटेसचा फायदा होऊ शकतो,” असे यास्मिन कराचीवाला यांनी उद्घाटनावेळी सांगितले.
पिलाटेसमध्ये किती व्यायाम करता यापेक्षा शरीराची हालचाल किती योग्य पद्धतीने करता, याला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. नियंत्रित हालचालींमुळे शरीराची ताकद वाढण्यास, हालचालींची क्षमता सुधारण्यास आणि स्वतःच्या शरीराची अधिक चांगली जाणीव निर्माण होण्यास मदत होते, असेही त्या म्हणाल्या. Pune YKBI Studio
मसल बारचे सहसंस्थापक मुर्तझा फखरुद्दीन नासिर यांनी सांगितले की, २०१९ मध्ये मसल बारची सुरुवात खुल्या जागेतील कॅलिस्थेनिक्स आणि फंक्शनल फिटनेसवर भर देणाऱ्या जिमच्या स्वरूपात करण्यात आली होती. आता विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि रिकव्हरी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पिलाटेसचा समावेश करण्यात आला आहे. YKBI सोबतची भागीदारी ही सर्व वयोगट आणि विविध फिटनेस पातळीवरील नागरिकांसाठी सर्वसमावेशक फिटनेस व्यवस्था उभारण्याच्या दिशेने पुढचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. Pune YKBI Studio
पुण्यातील YKBI स्टुडिओमध्ये मॅट, रिफॉर्मर, चेअर, टॉवर, मिक्स्ड इक्विपमेंट आणि स्मॉल इक्विपमेंट अशा विविध प्रकारच्या पिलाटेस सत्रांची सुविधा उपलब्ध आहे. स्टुडिओमध्ये रिफॉर्मर्स, चेअर्स आणि टॉवर्सबरोबरच मॅजिक सर्कल, स्ट्रेंथ स्ट्रॅप्स, पॉवर पॉड्स आणि बूटी बँड्ससारखी उपकरणेही उपलब्ध आहेत. Pune YKBI Studio
नवीन सदस्यांसाठी सुरुवातीच्या काळात विशेष पॅकेज देण्यात आले आहे. एका सत्रासाठी ९९९ रुपये, दहा दिवसांच्या वैधतेसह चार सत्रांसाठी २,९९९ रुपये आणि २० दिवसांच्या वैधतेसह सात सत्रांसाठी ४,९९९ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. Pune YKBI Studio
हा स्टुडिओ सोपानबाग, घोरपडी येथे असून सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. सदस्यत्वाबाबत माहितीसाठी ८६५७७३७५७८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे

