दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

Date:

मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२६: राज्यात दुष्काळाची छाया पसरली असल्याने महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’वर देत शासनाच्या दुष्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश दिले आहे. याबाबत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.

यंदाच्या जून महिन्यापासून राज्यात पर्जन्यमानामध्ये मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच शेती पिकांचे नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य शासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने देखील राज्यभरातील तांत्रिक यंत्रणा सतर्क केली आहे.

मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणचे संचालक श्री. धनजंय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. सचिन तालेवार (प्रकल्प), श्री राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी विविध परिमंडलांमध्ये तातडीने दौरे करून दुष्काळी परिस्थितीत कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध तांत्रिक कामांचा आढावा घेतला तसेच वीजयंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपायांचे निर्देश दिले.

यासोबतच महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रामुख्याने शेतीसह इतर सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाचा असलेला वीजपुरवठा सुरळीत राहील याची विशेष खबरदारी घ्यावी. एखाद्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून किंवा तातडीने दुरुस्ती कामे करून तो पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री...

गणेश विसर्जन मिरवणुकीतील आणखी ४ चोऱ्यांबाबत गुन्हे दाखल:4 लाखांहून अधिक ऐवज चोरीला

बुधवार चौक, लक्ष्मी रस्ता, सेवासदन चौक आणि कुंटे चौक...