माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

पुण्यातील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट; मंत्री छगन भुजबळ यांच्या खासगी सचिवांशी दूरध्वनीवर संपर्क, ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : राज्यातील शासकीय धान्य गोदामांतील माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित राहावा आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा निघावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. पुणे येथील कौन्सिल हॉलसमोर सुरू असलेल्या शासकीय धान्य गोदाम हमाल माथाडी कामगारांच्या बेमुदत धरणे सत्याग्रहाला आज त्यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.

शासकीय धान्य गोदामांतील थेट वाहतुकीसंबंधी २४ एप्रिल २०२६ रोजी काढलेल्या शासन आदेशामुळे राज्यातील सुमारे १० हजार नोंदणीकृत माथाडी कामगारांचा रोजगार धोक्यात आल्याचे कामगार संघटनांनी निवेदनात म्हटले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी २६ मे रोजी झालेल्या बैठकीत एकाही माथाडी कामगाराचा रोजगार हिरावला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिन्यांनंतरही संबंधित आदेश मागे घेण्यात आलेला नाही किंवा शुद्धिपत्रक काढण्यात आलेले नाही, असे संघटनांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हा कामगारांच्या रोजगाराचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न असल्याचे सांगितले. कामगारांनी शासन आदेशातील विसंगतीकडे लक्ष वेधले असून, त्यांच्या मागण्यांमधील सत्य आणि वस्तुस्थिती समजून घेऊन प्रश्न सोडविणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत ठीक नसल्याने खाजगी सचिव दयानंद चिंचोलीकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली. यासंदर्भात ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक होणार असून, या बैठकीत शासन आदेशातील दुरुस्ती आणि माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्याचा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी संबंधित शासन आदेश, पूर्वीच्या बैठकीतील निर्णय आणि न्यायालयीन याचिकांची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी कामगार प्रतिनिधींना केले. या कागदपत्रांचा अभ्यास करून कायदेशीर अडचणी स्पष्ट करता येतील आणि कामगारांच्या हितासाठी शासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यासाठी पाठपुरावा करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे प्रलंबित प्रश्न मांडण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नागपूरच्या अधिवेशनातही हे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

माथाडी, गोदाम, ऊसतोड आणि अन्य असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिला कामगारांना प्रसूती रजा आणि आवश्यक संरक्षण मिळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

संयुक्त कृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबरपासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवशी गोदामांतील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र, २९ सप्टेंबरपासून कामकाज सुरळीत सुरू असून प्रत्येक गोदामातील प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होत असल्याचे संघटनांनी सांगितले. डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांतून उभ्या राहिलेल्या या शांततापूर्ण व शिस्तबद्ध आंदोलनातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र हमाल संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मुगदम, सरचिटणीस सुभाष लोमटे यांच्यासह हमाल कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात युवक काँग्रेसचे महापालिका गेटवर आंदोलन !

पुणे:पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या...

प्रिंट मीडियासमोर एक भूमिका, कॅमेरासमोर दुसरी; नवलकिशोर राम यांच्यावर सवाल

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ₹90 कोटींच्या रस्ता निविदेवरून...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात

“नावे FIRमध्ये नोंदवा, संशयितांवर तातडीने कारवाई करा”; आरोपींना अटक...

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर पार्किंगपासून नदीवरील पुलापर्यंत महत्त्वाचे प्रस्ताव

विमाननगर व सोमवार पेठेत पार्किंग व्यवस्थापन, वडगावशेरी-मुंढवा नदीपुलासाठी सल्लागार...