आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात युवक काँग्रेसचे महापालिका गेटवर आंदोलन !

Date:

पुणे:पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या धमकीच्या घटनेचा पुणे शहर युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेवर निष्क्रीय राहिलेल्या आणि निद्रिस्त झालेल्या राज्य शासनाचा व स्थानिक प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कुंभकर्ण’ बनून झोपलेल्या ‘देवाभाऊ’ला उठवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आणि पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी आंदोलकांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर झोपलेल्या ‘कुंभकर्ण’ रुपी देवाभाऊंच्या प्रतीकात्मक पुतळ्याभोवती ढोल-ताशे वाजवून व जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे”, “ठेकेदारधार्जिणे सरकार हाय हाय”, अशा विविध घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला होता.

प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांना जर सत्ताधारी पक्षाचे आमदार ॲट्रॉसिटी आणि हक्कभंगाच्या धमक्या देत असतील, तर सामान्य जनतेचे काय? हे सरकार आणि गृहमंत्रालय झोपेचे सोंग घेत असून त्यांना जागे करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे.”

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी इशारा देताना म्हटले की, “महापालिकेचा निधी वाचवून पारदर्शकपणे काम करणाऱ्या आयुक्तांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. आयुक्तांना धमकी देणाऱ्या त्या आमदाराचे नाव तातडीने जाहीर करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेस संपूर्ण शहरात याहून तीव्र आंदोलन करेल.”

यावेळी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष ( पूर्व ) प्रशांत जगताप, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, नगरसेवक सुनील शिंदे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वातीशिंदे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव मेघश्याम धर्मावात, दिलीपसिंह देशमुख, पुणे शहर युवक काँग्रेस वकील सेल अध्यक्ष ऋषिकेश थोरात, पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सद्दाम शेख, अभिजीत चव्हाण, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष विक्रांत धौत्रे, शहर महासचिव सागर धावडे, स्वप्नील गायकवाड, यश कोलते, अक्षय नवगिरे, कार्तिक शिरहट्टी, असिफ सय्यद, अझर शेख, रेहान बाबुर्डे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट; मंत्री छगन भुजबळ यांच्या...

प्रिंट मीडियासमोर एक भूमिका, कॅमेरासमोर दुसरी; नवलकिशोर राम यांच्यावर सवाल

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ₹90 कोटींच्या रस्ता निविदेवरून...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात

“नावे FIRमध्ये नोंदवा, संशयितांवर तातडीने कारवाई करा”; आरोपींना अटक...

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर पार्किंगपासून नदीवरील पुलापर्यंत महत्त्वाचे प्रस्ताव

विमाननगर व सोमवार पेठेत पार्किंग व्यवस्थापन, वडगावशेरी-मुंढवा नदीपुलासाठी सल्लागार...