कोथरूडमधील शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते रस्ता 36 मीटर होईपर्यंत बांधकाम परवाने स्थगित करा

Date:

दिलीप वेडेपाटील आणि रोहिणी चिमटे यांचा स्थायी समितीसमोर ठराव; अंतिम निर्णय होईपर्यंत प्रस्तावित रस्ता हद्दीतील बांधकामांना स्थगितीचा मुद्दा

पुणे : कोथरूडच्या नवीन हद्दीतील शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग हा संपूर्ण रस्ता 36 मीटर रुंदीने विकसित करण्याचा प्रस्ताव दिलीप वेडेपाटील आणि रोहिणी चिमटे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवला आहे. हा विषय स्थायी समितीच्या 1 ऑक्टोबरच्या बैठकीत विषय क्रमांक 1276 म्हणून विचारासाठी येणार आहे. या प्रस्तावात रस्त्याची अंतिम रुंदी निश्चित होईपर्यंत प्रस्तावित रस्ता हद्दीतील नवीन बांधकामे आणि पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी देऊ नये अथवा आवश्यक ती स्थगिती द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावात नमूद केल्यानुसार, पुणे महापालिकेच्या 1986 च्या विकास आराखड्यात जुन्या कोथरूड हद्दीतील भारतरत्न महर्षी कर्वे स्मारक ते शांतिवन चौक हा रस्ता 36 मीटर रुंदीने विकसित करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्यात कोथरूडच्या नवीन हद्दीत याच रस्त्याचा पुढील भाग केवळ 15 मीटर रुंदीचा दर्शवण्यात आला आहे. या विसंगतीचा भविष्यातील वाहतूक नियोजनावर परिणाम होऊ शकतो, असे प्रस्तावात म्हटले आहे.

कोथरूड परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग हा संपूर्ण रस्ता 36 मीटर रुंदीने विकसित करण्याचा विचार या प्रस्तावात मांडण्यात आला आहे. हा रस्ता विकसित झाल्यास पौड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन चांदणी चौक आणि राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल, असे प्रस्तावात नमूद आहे.

चांदणी चौक वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. त्या पार्श्वभूमीवर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचे नियोजन आवश्यक असून हा रस्ता केवळ 15 मीटर ठेवणे भविष्यातील शहर नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे प्रस्तावात म्हटले आहे. SC Karyapatrika 27 (01-10-26)_u…

सध्या या परिसरात नवीन बांधकामे आणि पुनर्विकासाची कामे सुरू असल्याने भविष्यातील रस्ता रुंदीकरणाची संधी गमावली जाऊ नये, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावानुसार, शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग हा संपूर्ण रस्ता 36 मीटर रुंदीने विकसित करण्याबाबत शहर सुधारणा समितीमार्फत आवश्यक कार्यवाही करून मान्यता किंवा शिफारस द्यावी. तसेच 36 मीटर रुंदीनुसार विकास आराखड्यात आवश्यक कार्यवाही आणि भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रस्तावित रस्त्याच्या हद्दीतील नवीन बांधकामे व पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी देऊ नये अथवा आवश्यक ती स्थगिती द्यावी, असेही ठरावात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट; मंत्री छगन भुजबळ यांच्या...

आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात युवक काँग्रेसचे महापालिका गेटवर आंदोलन !

पुणे:पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या...

प्रिंट मीडियासमोर एक भूमिका, कॅमेरासमोर दुसरी; नवलकिशोर राम यांच्यावर सवाल

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ₹90 कोटींच्या रस्ता निविदेवरून...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात

“नावे FIRमध्ये नोंदवा, संशयितांवर तातडीने कारवाई करा”; आरोपींना अटक...