पाषाण चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा प्रस्ताव स्थायी समितीसमोर

Date:

ग्रेड सेपरेटर, चौक रुंदीकरण, पर्यायी रस्ता आणि प्रलंबित 24 मीटर डीपी रस्त्याच्या कामावर निर्णय अपेक्षित

पुणे : पाषाण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मयुरी कोकाटे आणि रत्नमाला सातव यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सविस्तर प्रस्ताव ठेवला आहे. पाषाण चौकात सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

प्रस्तावात म्हटले आहे की, 18 सप्टेंबर 2026 रोजी प्रकल्प प्रमुख दिनकर गोजारे, पथ विभाग प्रमुख राजेश बनकर आणि अधीक्षक अभियंता रमेश वाघमारे यांच्यासह संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर पाषाण चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही महत्त्वाची कामे तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.

पाषाण चौकात ग्रेड सेपरेटर आणि रुंदीकरणाचा प्रस्ताव

प्रस्तावानुसार, पाषाण चौकातील वाहतूक नियोजनासाठी DRDOच्या जागेची संमती घेऊन ग्रेड सेपरेटर उभारणे, चौकाचे रुंदीकरण करणे आणि वाहतूक बेट विकसित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या कामामुळे चौकातील वाहनांची हालचाल अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

सोमेश्वरवाडीला पर्यायी रस्ता

पाषाण चौकावरील ताण कमी करण्यासाठी डिफेन्स हद्दीलगत निम्हणमळा मार्गे सोमेश्वरवाडीला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास पाषाण चौकातून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते, असे प्रस्तावातून सुचवण्यात आले आहे.

24 मीटर डीपी रस्ता आणि राम नदीवरील पुलाचे काम

प्रस्तावात निम्हणमळा ते सुस रोडला जोडणारा प्रलंबित 24 मीटर रुंदीचा डीपी रस्ता आणि राम नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. या मार्गामुळे परिसरातील पर्यायी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

या सर्व कामांसाठी आवश्यक असलेल्या DRDO अथवा संरक्षण विभागाच्या जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा आणि महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांची संयुक्त बैठक घ्यावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

निम्हणमळा परिसरातील बाधित नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देत रस्ता विकासाची कार्यवाही सुरू करावी आणि या कामांसाठी 2026-27 च्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माथाडी कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट; मंत्री छगन भुजबळ यांच्या...

आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात युवक काँग्रेसचे महापालिका गेटवर आंदोलन !

पुणे:पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या...

प्रिंट मीडियासमोर एक भूमिका, कॅमेरासमोर दुसरी; नवलकिशोर राम यांच्यावर सवाल

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ₹90 कोटींच्या रस्ता निविदेवरून...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात

“नावे FIRमध्ये नोंदवा, संशयितांवर तातडीने कारवाई करा”; आरोपींना अटक...