पुणे : लक्ष्मी रोडवरील शगुन चौक परिसरातील बँक ऑफ इंडिया कार्यालयाच्या इमारतीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
पुणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.११ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यवर्ती, कसबा, एरंडवणे, नायडू आणि कोंढवा अग्निशमन केंद्रांतून ४ फायरगाड्या आणि ३ वॉटर टँकर अशी एकूण ७ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन जवानांनी आग इतरत्र पसरू नये यासाठी होज पाईप, बीए सेट, रश्शी आणि एक्स्झॉस्ट ब्लोअर यांसारख्या साधनांचा वापर केला. लक्ष्मी रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
प्राथमिक माहितीनुसार, सहाव्या मजल्यावरील कार्यालयातील एका एसीला आग लागली. सुरक्षारक्षकाने फायर एक्स्टिंग्युशरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग नियंत्रणात न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सुमारे ८० बाय ८० फूट हॉलमध्ये प्लायवुड पार्टिशनद्वारे चार कार्यालये तयार करण्यात आली होती. त्यातील तीन कार्यालयांमधील संगणक, टेबल, खुर्च्या, एसी, इलेक्ट्रिक वायरिंग, बॅटरी, प्रिंटर, झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
या कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि जवळपास तीस जवान सहभागी झाले. घटनास्थळी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, बांधकाम विभाग, पोलीस दल आणि महावितरणचे अधिकारीही उपस्थित होते. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
दरम्यान, पुणे शहरातील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विविध आस्थापनांची नियमित तपासणी करण्याचे आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलाने सर्व आस्थापनांना आवश्यक अग्निसुरक्षा ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात हॉटेल, पेइंग गेस्ट, क्लासेस आणि रुग्णालयांसह ४१४ आस्थापनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पुणे शहराच्या अग्निसुरक्षततेसाठी
मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले की, ही आग मोठी होती; मात्र जवानांनी वेळीच प्रयत्न करून आग इतरत्र पसरू दिली नाही आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

