बाणेर-पाषाण लिंक रोडचा १५ वर्षांचा भूसंपादन तिढा सुटला; ६८ कोटींच्या मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण, जागेचा ताबा सुरू

Date:

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर-पाषाण लिंक रोड अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेले आणि मागील सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले भूसंपादन पूर्ण करण्यात आले असून अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर झाला आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांच्या मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिका आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर संबंधित जागा मालकांना मोबदला अदा करून आवश्यक जागेचा ताबा मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पुणे शहराच्या मंजूर विकास योजनेनुसार मौजे पेठ पाषाण, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे क्र. १३४ (पै) ते १३८ व १४० मधून जाणाऱ्या ३६ मीटर रुंद विकास योजना रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अनेक वर्षांपासून रखडले होते. हा रस्ता बाणेर-पाषाण लिंक रोड म्हणून ओळखला जातो.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमार्फत सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम अदा अथवा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्यात आली आहे.

कायदेशीर आणि आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम निवाडा जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकृत ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा पर्यायी संपर्कमार्ग ठरणार आहे.

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले भूसंपादन मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे, तसेच संबंधित उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मालमत्ता विभाग, बांधकाम विभाग आणि पथ विभागाने सातत्याने पाठपुरावा केला.

विशेष भूमिसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वयामुळे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष ताब्याचा टप्पा गाठण्यात आला आहे.

जागेचा ताबा पूर्ण झाल्यानंतर पथ विभागामार्फत रस्त्याचे उर्वरित काम तातडीने हाती घेतले जाणार असून बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या ‘मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी’ला IFFI २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिजसाठी नामांकन!

टाटा समूहाच्या ‘टायटन’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास पडद्यावर; प्रबलीन संधू...

महावितरणमध्ये २३ हजार पदांची थेट भरती? सोशल मीडियावरील जाहिराती बनावट; उमेदवारांना सावधानतेचा इशारा!

दहावी उत्तीर्णांना परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय नोकरीचे आमिष; अशा जाहिरातींशी...