बारामतीत दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या; ओसरीत झोपलेल्या असताना मध्यरात्री हल्ला

Date:

पुणे : बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) गावात घराबाहेरील ओसरीत झोपलेल्या दोन वृद्ध महिलांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) अशी मृत महिलांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चोरी अथवा लुटीच्या उद्देशातून हे दुहेरी हत्याकांड झाले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

इंदुमती लडकत या शेरेवाडी येथील आपल्या घरी राहत होत्या. त्या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा बारामती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर दुसरा बंगळुरू येथे नोकरीला आहे. कृष्णाबाई लडकत या इंदुमती यांच्या शेजारी राहत होत्या. इंदुमती यांना रात्री सोबत मिळावी म्हणून कृष्णाबाई अनेकदा त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत असत.

सोमवारी रात्रीही दोघी घराबाहेरील ओसरीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गळा चिरला. या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून नेण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

महिलांनी हल्लेखोराला प्रतिकार केला होता का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घरातील दरवाजा आणि कपाटे उघडी आढळून आली असून, मंगळसूत्रांव्यतिरिक्त अन्य दागिने किंवा वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याचीही पाहणी सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रात्री झालेली संशयितांची ये-जा तसेच घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. कृष्णाबाई यांचा मुलगा शेती व्यवसाय करतो असून तोही घटनास्थळी उपस्थित होता.

या दुहेरी हत्याकांडामुळे शेरेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या काही भागाच्या हटवणीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

सिंहस्थ २०२८साठी रस्ता रुंदीकरणाचा वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, उच्च...

खडकवासला निम्म्यावर; चार धरणांच्या साठ्यात 1.35 TMC घट

७ सप्टेंबरला गेल्या वर्षीएवढीच भरलेली धरणे, पण आता साठ्याची...

गणेशोत्सव मंडळांना नियम शिकवू नका’; ढोल-ताशा महासंघाविरोधात मानाच्या दोन गणपती मंडळांची आक्रमक भूमिका

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांचे संयुक्त निवेदन; ‘मंडळांच्या...