१७ ऑक्टोबरला पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद-२०२६’

Date:

व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील भिक्खुनी व अभ्यासकांचा सहभाग; चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन

पुणे : विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. परिषदेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

या आयोजन समितीत भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे तसेच पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांचा समावेश आहे. परिषदेत व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील नामांकित भिक्खुनी तसेच विविध क्षेत्रांतील अभ्यासक वक्ते आणि चर्चासत्रातील सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत.

या परिषदेची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ‘All India Depressed Classes Women’s Conference’ या ऐतिहासिक महिला परिषदेतून घेतली असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. त्या परिषदेत महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांवर विचारमंथन झाले होते. त्याच ऐतिहासिक परंपरेतून पुण्यात प्रथमच अशा स्वरूपाची आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद आयोजित केली जात आहे.

परिषदेचे आयोजन महिलांनी केले असून वक्त्यांमध्येही महिलांचा प्रमुख सहभाग असेल. मात्र, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सहभागी होण्यासाठी www.thewisdominmotion.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

परिषदेत भिक्खुनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या बौद्ध महिलांच्या प्रवासाचा मागोवा घेतला जाणार आहे. बौद्ध महिलांचे योगदान, नेतृत्व, शिक्षण, सामाजिक परिवर्तन तसेच समकालीन आव्हाने या विषयांवर विविध सत्रांत चर्चा होणार आहे.

भिक्खुनी संघाविषयी बुद्धांची दृष्टी आणि समानता व सामाजिक न्यायाप्रती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कटिबद्धता यांपासून प्रेरणा घेऊन ही परिषद आयोजित केली जात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. भिक्खू-भिक्खुनी, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक आणि समाजनेते यांना एका व्यासपीठावर आणणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुमारे २,६०० वर्षांपूर्वी भिक्खुनी संघाची स्थापना करून बुद्धांनी स्त्रियांनाही धम्माचा मार्ग खुला केला, या ऐतिहासिक दृष्टिकोनासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानता, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांतून ही परिषद संवाद, अध्ययन आणि सहकार्यासाठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेबाबत अधिक माहितीसाठी ७८८८१२९१६९ किंवा ८९७५७३८६३३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऑटोरिक्षा परवान्यांसाठी मुदतवाढ

इरादापत्र आणि बदली वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय पुणे...

प्रवासी वाहतूक चालकांनी कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व घ्यावे

ज्येष्ठ चालकांना १० हजारांचा सन्मान निधी; आरटीओतर्फे जनजागृती मोहीम पुणे...

चोर है, चोर है एअरलाइन चोर है…संतप्त प्रवाशांची घोषणाबाजी

दुबईला जाणारी स्पाइसजेटची दोन विमाने २४ तासांहून अधिक उशिरा;...

राज्यात समान नागरी कायद्याबाबत लवकरच निर्णय? एकनाथ शिंदेंचे संकेत

मराठा आरक्षणावर जरांगेंना पुनर्विचाराचे आवाहन; दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवरही...