महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी लोकेश चंद्र

Date:

महावितरणकडून अभियंता दिन उत्साहात 

मुंबई: ‘अभियांत्रिकी ही केवळ एक नोकरी किंवा व्यवसाय नसून तो देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा मुख्य कणा आहे. राज्यातील घरे, व्यवसाय, उद्योग, कृषी अशा ३ कोटींवर ग्राहकांकडे दररोज वीजपुरवठा पोहोचवण्यामागे अभियंत्यांचे कौशल्य व महत्वाचे योगदान आहे. वीजक्षेत्राच्या माध्यमातून महावितरणचे अभियंते राज्याच्या प्रगतीला गती देत आहेत’, अशा शब्दांत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव केला.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १५) ‘प्रकाशगड’ मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

ऊर्जा क्षेत्रात सध्या मोठे बदल होत असून हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. या बदलत्या काळात अभियंत्यांची भूमिका अधिक जबाबदारीची बनली आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. वीजग्राहकांच्या तत्पर सेवेला आणि कामात सुरक्षितता व तांत्रिक उत्कृष्टतेच्या दर्जेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन श्री. लोकेश चंद्र यांनी केले.

यावेळी संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर म्हणाले की, ‘महावितरणच्या अभियंत्यांचे कार्यकौशल्य आणि अहोरात्र मेहनत यामुळे महावितरणसह राज्याची प्रगतीकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. अभियंत्यांच्या याच प्रयत्नांमुळे भविष्यातील हरित क्रांती आणि शून्य प्रदूषणाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल’.

संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी यांनी महावितरण समोरील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभियंत्यांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज व्यक्त केली. संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी विविध आघाड्यांवर काम करताना ताण – तणावाचे योग्य व्यवस्थापन करून नोकरी व कुटुंब यांच्यात योग्य समतोल राखण्याचे आवाहन केले. संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार म्हणाले, महावितरणच्या यंदाच्या अभियंता दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे महावितरणच्या अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जेचा अंगिकार आणि वीजबचतीचा जागर सुरू केला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपले सगळे अभियंते कृतीतून अभियंता दिवस साजरा करून सामाजिक जबाबदारी देखील निभावत आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, भुजंग खंदारे, दिनेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मुख्य अभियंते मनीष वाठ, अंकुर कावळे, ज्ञानेश कुलकर्णी, मंगेश कोहाट, अशोक साळुंखे, संतोष सांगळे, प्रशांत दानोलीकर, पंकज तगलपल्लेवार, सुचित्रा गुजर, कविता घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१७ ऑक्टोबरला पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद-२०२६’

व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील भिक्खुनी व अभ्यासकांचा...

चोर है, चोर है एअरलाइन चोर है…संतप्त प्रवाशांची घोषणाबाजी

दुबईला जाणारी स्पाइसजेटची दोन विमाने २४ तासांहून अधिक उशिरा;...

राज्यात समान नागरी कायद्याबाबत लवकरच निर्णय? एकनाथ शिंदेंचे संकेत

मराठा आरक्षणावर जरांगेंना पुनर्विचाराचे आवाहन; दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवरही...

सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या हस्ते महापौर बंगल्यातील श्रीगणरायाची आरती

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त...