३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना; येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची निवड

Date:

डॉ. अभिजित चौधरी व डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना; ‘प्रेरणापथ’ प्रकल्पातून बंदी बांधवांच्या परिवर्तनाला नवी दिशा

पुणे : ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना सोमवारी नेहरू स्टेडियम येथील हॉटेल सारस येथे उत्साहात पार पडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना संपन्न झाली.

यावेळी येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गणेशमूर्ती आवर्जून प्रतिष्ठापनेसाठी आणण्यात आली होती. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी पूजेचे पौराहित्य केले. या निमित्ताने हॉटेल सारस येथील हॉल आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.

कैद्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची विशेष दखल

कैदी बांधवांना गुन्हेगारीच्या प्रवृत्तीपासून दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे ‘प्रेरणापथ’ हा प्रकल्प राबविला जात आहे.

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बंदी बांधवांना जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातून १०० हून अधिक बंदी बांधवांनी ३०० पेक्षा अधिक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

या उपक्रमाची दखल घेत पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी या प्रकल्पाला भेट दिली आणि पुणे फेस्टिव्हलसाठी एक गणेशमूर्ती निवडली. बंदी बांधवांच्या सुधारणेच्या वाटचालीचा शुभारंभ पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रकल्पाचे समन्वयक

या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील धमाळ, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई आणि आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप कार्यरत आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, रमेश बागवे, सुनील शिंदे, अबेदा इनामदार, आय. पी. इनामदार, काका धर्मावत, राजू साठे, अतुल गोंजारी, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सुप्रिया ताम्हाणे, अॅड. अनुराधा भारती, अशोक मेमजादे, डॉ. रवी चौधरी, कर्ना उपाध्याय, आबा जगताप, संयोगिता कुदळे, तेजश्री अडिगे, नावेद अत्तार आदी उपस्थित होते.

याशिवाय विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन खवले, विजय शेटे तसेच एन. आय. ई. एम.चे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीत ९ गणेश मंडळांची एकत्रित भव्य सार्वजनिक मिरवणूक

‘एआयच्या युगात युवकांनी जागतिक भाषा शिकाव्यात’; डॉ. दीपक शिकारपूर...

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान

मिरवणुकीत सप्तरंगांची उधळण अन् सात थरांनी बाप्पांचे जंगी स्वागत ज्येष्ठ...

महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळावे, श्री गणरायाच्या चरणी साकडे : डॉ. नीलम गोऱ्हे

वरळी मुंबई येथील ‘बसंत-पार्वती’ ते पुणे ‘सिल्व्हर रॉक्स’ पाच...