वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

Date:

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची यंदाची भव्य आरास

मुंबई
देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गुजरातमधील प्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिराची भव्य आरास साकारली आहे. मंडळाचे संस्थापक व सल्लागार तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ही आरास साकारण्यात येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यवैभवाची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

मंदिराच्या स्थापत्यवैभवाची हुबेहूब अनुभूती
गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. अनेक ऐतिहासिक आक्रमणांनंतरही या मंदिराचे पुनर्निर्माण होत राहिले. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने मंदिराच्या पुनर्बांधणीला चालना मिळाली आणि १९५१ मध्ये मंदिराची पुनर्प्रतिष्ठा झाली.
या ऐतिहासिक मंदिराची रचना, शिखर, सभामंडप, कोरीवकाम आणि परिसराचे सौंदर्य यांचा बारकाईने अभ्यास करून गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना मुंबईतच सोमनाथ मंदिराच्या स्थापत्यवैभवाची अनुभूती घेता येणार आहे. तसेच या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली रोषणाई हेही दरवर्षी प्रमाणे तरुणांचे आकर्षक ठरेल, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

मंदिरांच्या आरासेची परंपरा
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या आरासीतून देशातील विविध प्रसिद्ध देवस्थानांची ओळख मुंबईकरांना करून दिली आहे. यापूर्वी मंडळाने शिर्डीचे साई मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केदारनाथ मंदिर तसेच गोव्यातील श्री शांतादुर्गा मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या.
मंडळाच्या या उपक्रमाला दरवर्षी भाविक आणि मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्यकलेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
गणेशोत्सवातून धार्मिक पर्यटनाचा संदेश
यंदाच्या आरासीतून सोमनाथ मंदिराचा इतिहास, भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि मंदिराचे स्थापत्यवैभव यांची माहिती देण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांकडे केवळ श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता त्यामागील इतिहास, कला, स्थापत्य आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याचा संदेशही या आरासीतून दिला जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच9 गणेश मंडळांची संयुक्त मिरवणूक

चित्ररथाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता ः फायदे आणि भविष्य पुणे: राष्ट्रीय...

महारेराचा ‘ॲक्वारा बिल्डर्स’ला दणका

ॲक्वारा प्राइडमधील चार सदनिकाधारकांना विलंब व्याज देण्याचे आदेश पुणे :...

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला भुईकोट किल्ला राज्य संरक्षित स्मारक जतन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार मुंबई, श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर...