850 विद्यार्थ्यांनी घेतली एकाच छताखाली परदेशी शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती

Date:

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2026’ला पुण्यातील बोट क्लब येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेअरमध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि दुबई येथील सुमारे 60 हून अधिक नामांकित विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध पर्यायांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना पूर्णपणे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

परदेशात शिक्षण घेण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात—योग्य देश व विद्यापीठाची निवड, शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया, उपलब्ध शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) तसेच प्रवेश प्रक्रिया यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन या फेअरमध्ये करण्यात आले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान झाले.

‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांनी सांगितले की, या फेअरमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील जागतिक शिक्षणाच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. यंदाच्या फेअरमध्ये 850 हून अधिक विद्यार्थी आणि 1200 हून अधिक पालकांनी सहभाग घेत मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. तसेच आतापर्यंत १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून परदेशातील विद्यापीठांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने केले स्वागत

नवी दिल्ली/पुणे १८व्या BRICS शिखर परिषदेच्या निमित्ताने व्हिएतनामचे पंतप्रधान श्री...

भगवान वराह जयंतीनिमित्त पुण्यात रविवारी भव्य मिरवणूक

पुणे : श्री भगवान वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज,...

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा...

सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची बाब नसून सामाजिक जबाबदारी...