जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Date:

वाजत-गाजत निघणार बाप्पाची आगमन मिरवणूक

पुणे : प्रतिनिधी – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची जंगी आगमन मिरवणूक देखील निघणार आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर उत्सव मंडपातून सव्वा आठ वाजता श्रींची आगमन मिरवणूक सुरू होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना, केशव शंखनाद ही ढोल पथके या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीत वादन करणार आहेत. याशिवाय आढावा बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळ ही मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत.

सकाळी सव्वा आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौकात आणि तेथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता मार्ग या मिरवणुकीचे आगमन गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. त्यानंतर साडे बारा वाजता जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहावे, ही विनंती!
– पुनीत बालन
(उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा...

सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची बाब नसून सामाजिक जबाबदारी...

येरवडा परिसरातील विकासकामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

रस्ते, मिसिंग लिंक, भूसंपादन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा आढावा;...