चांदणी चौक–घोटवडे फाटा–पिरंगुट–हिंजवडी मेट्रोचा DPR तयार करा : मुरलीधर मोहोळ

Date:

‘दिशा’ बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा; मेट्रो, आवास, भारतनेट, जलजीवन मिशनसह प्रलंबित कामांना कालबद्ध गती देण्याचे निर्देश

पुणे : केंद्र शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील प्रलंबित कामांना स्पष्ट उद्दिष्ट व कालमर्यादा निश्चित करून तातडीने गती द्यावी, तसेच चांदणी चौक–घोटवडे फाटा–पिरंगुट–हिंजवडी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच मागील बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, विविध आमदार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या रखडलेल्या प्रस्तावांना गती

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावांवर चर्चा करताना वनाज–चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती, रामवाडी–वाघोली मार्गिकेस आवश्यक मान्यता तसेच लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा DPR निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले.

याचबरोबर चांदणी चौक–घोटवडे फाटा–पिरंगुट–हिंजवडी या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा DPR तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मार्ग आवश्यक असल्याचे सांगत प्रस्तावाला अनुमोदन दिले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे कालबद्ध करा

प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुणे महापालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी 3,227 अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी येथील सुमारे 6,800 घरांशी संबंधित भूसंपादन व हस्तांतरणाची प्रक्रिया कालबद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील 38,465 घरांपैकी 9,258 घरे पूर्ण झाली असून 29,207 घरे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक तालुक्याला मासिक उद्दिष्ट देऊन कामाला गती देण्याचे मोहोळ यांनी सांगितले.

प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारतनेट

भारतनेट अंतर्गत पुणे बिझनेस एरियात 1,490 कार्यरत जोडण्या आणि 1,366 ग्राहक जोडण्या कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील सुमारे 1,400 ग्रामपंचायतींना भारतनेटशी जोडण्यासाठी वर्षनिहाय आणि तालुकानिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

‘स्वामित्व’च्या उर्वरित मिळकत पत्रिका तीन महिन्यांत

स्वामित्व योजनेंतर्गत 1,100 गावांची ड्रोन मोजणी पूर्ण झाली असून 829 गावांमध्ये 1 लाख 13 हजार 115 मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित सनद आणि मिळकत पत्रिकांचे वितरण तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

जलजीवन मिशनची कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात 1,239 योजना हाती घेण्यात आल्या आहेत. अद्याप 39,255 नळजोडण्या शिल्लक असून उर्वरित नळजोडण्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजना मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले.

पुरंदर विमानतळाचे 70 टक्के भूसंपादन पूर्ण

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाकांक्षी पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत सुमारे 70 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती दिली. उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण, भारतीय विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प, सूक्ष्म कृषी सिंचन, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री स्वनिधी, भूजल सर्वेक्षण आणि जलशक्ती अभियान यासह विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिव्यांगांसाठी ‘पर्पल डॉट्स’ उपक्रमाची पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी

३ डिसेंबरपूर्वी प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट; सेवा, प्रशिक्षण, पुनर्वसन...

भारती विद्यापीठातील MBBS विद्यार्थिनीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू

21 वर्षीय तरुणी भारती विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकत होती;...

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार मुंबई, दि. 9: श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची...

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई,:राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा...