कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

Date:

कपिलामृत डेअरीजवळ दुचाकीला कंटेनरची धडक; वडील आणि बहीण किरकोळ जखमी

पुणे : प्रतिनिधी

कात्रज-कोंढवा रस्त्यावर मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. कपिलामृत डेअरीजवळ दुचाकीला यूटर्न घेत असताना कंटेनरने धडक दिल्याने प्रतिभा नाईक ही मुलगी कंटेनरच्या चाकाखाली आली. या अपघातात तिची बहीण वैष्णवी नाईक आणि वडील किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक कुटुंबातील तिघे दुचाकीवरून कात्रज-कोंढवा रस्त्याने जात होते. दुपारी एकच्या सुमारास कपिलामृत डेअरीजवळ दुचाकीला यूटर्न घेत असताना कात्रजकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली.

धडकेनंतर दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले. यामध्ये प्रतिभा कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना भारती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्रतिभाचा मृत्यू झाला. तिची बहीण वैष्णवी आणि वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनर (HR 38 W 6977) तसेच चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक MH 12 ZM 3579 आहे.

या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षा आणि यूटर्नच्या ठिकाणांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, दि. ८...