समाविष्ट ३२ गावांच्या मिळकतकर नोंदींच्या सखोल ऑडिटचा प्रस्ताव

Date:

दरवर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त; GISसह डिजिटल पडताळणीची मागणी

पुणे :

पुणे महानगरपालिकेत २०१७ आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकतकर नोंदींचे सखोल ऑडिट करण्यात यावे, असा प्रस्ताव स्थायी समिती सदस्य अरविंद शिंदे, सुरज लोखंडे, कालिंदा पुंडे, पल्लवी जावळे, सुनील पांडे, किशोर धायरकर,दत्ता बहिरट, वैशाली भालेराव आणि दिपाली डोखे यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

या प्रस्तावात असे म्हटले आहे की, ३२ गावांतील मिळकती, करआकारणीसंबंधी अभिलेख आणि इतर आवश्यक नोंदी ग्रामपंचायतींकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र या नोंदींची सखोल तपासणी करणे महापालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रस्तावात पुढे असे म्हटले आहे की, काही ग्रामपंचायतींच्या अभिलेखांमध्ये मिळकतींचा वापर, प्रकार आणि अस्तित्व याबाबत गंभीर विसंगती आढळल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्षात बिगरनिवासी असलेल्या मिळकतींची नोंद निवासी म्हणून झाल्याचा, तर औद्योगिक शेड, गोदामे, फर्निचर दुकाने आणि हॉटेल्स यांसारख्या मिळकतींबाबतही विसंगत नोंदी झाल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे.

मिळकतीचा प्रत्यक्ष वापर, बांधकामाचे अस्तित्व, क्षेत्रफळ, वापरातील बदल आणि करपात्र मूल्य यांची प्रत्यक्ष पडताळणी न करता केवळ ग्रामपंचायत अभिलेखांच्या आधारे करआकारणी झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास दरवर्षी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न बुडण्याची शक्यता प्रस्तावातून व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रस्तावात २०२१ पासूनच्या नोंदींची तपासणी करण्यात यावी, चुकीच्या नोंदींमुळे महसूलहानी झाल्याचे आढळल्यास मागील कालावधीतील करफरकाची वसुली करावी आणि संबंधित नोंदी कोणी व कोणत्या आधारावर केल्या याची जबाबदारी निश्चित करावी, असेही म्हटले आहे.

तसेच स्वतंत्र लेखापरीक्षक अथवा तज्ज्ञ पथक नियुक्त करून गावनिहाय आणि मिळकतनिहाय अहवाल तयार करावा. भविष्यात अशा नोंदी टाळण्यासाठी भौतिक सर्वेक्षण, GIS नकाशे, बांधकाम परवानग्या आणि प्रत्यक्ष वापराच्या आधारे डिजिटल पडताळणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही प्रस्तावातून करण्यात आली आहे.

येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संतोष पंडित यांना 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

कोथरूड पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू; आयफोन, सिमकार्ड, ट्रायपॉड...

शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई, दि....

भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही : देवेंद्र भुजबळ

मुंबई : भाषा ही माणसांना जोडण्याचे माध्यम आहे. त्यामुळे...

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षण आणि गुरू हा पाया होता, तोपर्यंत समाज...