पुणे फेस्टिव्हलतर्फे “इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!” या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेचे आयोजन

Date:

पुणे- “इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!”पुणे ही केवळ विद्येची, संस्कृतीची आणि कलांची नगरी नाही, तर आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि वैभवशाली सांस्कृतिक वारशाचा जिवंत आरसा आहे. या नगरीच्या इतिहासाशी जोडलेल्या असंख्य कथा, व्यक्तिमत्त्वे, वास्तू, घटना, परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा आजही आपल्याशी संवाद साधत आहेत.याच समृद्ध वारशाला दृक्-श्राव्य माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्यासाठी पुणे फेस्टिव्हलतर्फे “इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!” या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेची संकल्पना व संयोजन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांची असून याचे दिग्दर्शक सुनील नाईक आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई व विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते.  

स्पर्धेची संकल्पना – या स्पर्धेसाठी विषय आयोजकांकडून दिले जातील. स्पर्धकांनी आयोजकांनी दिलेल्या विषयावर ५ ते १० मिनिटांचा लघुपट तयार करावयाचा आहे. विषयाची मांडणी करताना इतिहास, संस्कृती, परंपरा, व्यक्तिमत्त्वे आणि घटनांकडे सर्जनशील आणि सिनेमॅटिक दृष्टिकोनातून पाहण्याची
संधी कलावंतांना मिळणार आहे. प्रभावी कथानक, दर्जेदार चित्रिकरण, सुंदर छायांकन, परिणामकारक Voice Over, पार्श्वसंगीत, नाट्यात्मक दृश्यरचना आणि कल्पक सिनेमॅटिक मांडणी यांचा आवश्यकतेनुसार वापर करता येईल.

कलावंतांसाठी विशेष संधी – ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून नवोदित आणि अनुभवी कलावंतांना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ आहे. लघुपट बनवणाऱ्या कलावंतांना जागतिक ओळख मिळवून देण्याची ही एक अनोखी संधी आहे. पुण्याच्या इतिहासाची कथा तुमच्या कॅमेऱ्यातून उलगडू द्या. तुमची कल्पना, तुमची दृष्टी आणि तुमची कलाकृती — पुण्याच्या इतिहासाला नवा सिनेमॅटिक आरसा देऊ शकते!

तांत्रिक स्वरूप – कालावधी : ५ ते १० मिनिटे, Format : MP4 / MOV, Resolution : 1080p

पुरस्कार – प्रथम / द्वितीय / तृतीय क्रमांक दिले जातील. त्यात रोख रक्कम + ट्रॉफी + प्रमाणपत्र असणार आहे. तसेच दिग्दर्शन / छायाचित्रण / ध्वनिमुद्रण इत्यादींसाठी विशेष पुरस्कार देखील दिले जातील.

फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर २०२६

एक प्रभावी शेवट – “इतिहास फक्त पुस्तकांत जतन करू नका… तो कॅमेऱ्यात कैद करा! तुमच्या नजरेतून पुण्याचा इतिहास पाहू द्या… कारण तुमचा लघुपट ठरू शकतो — पुण्याच्या इतिहासाचा नवा आरसा!”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मार्ट मीटरची छेडछाड अंगलट;भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणकडून गुन्हे दाखल

मीटरचे सील तोडून गती कमी करण्याचा प्रयत्न ९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी; उर्वरित १० प्रकरणांत कारवाई सुरू पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीज वापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे. चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला. स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे. गुन्हा दाखल झालेली प्रकरणे महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे : •             शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली = २,६६,८०० रुपये •             सचिन भास्करराव तायडे = १,१८,३६० रुपये •             सुरज संजीवकुमार सूर्यवंशी = १,५३,७७० रुपये •             दयानंद श्रीमंत रसाळ = १,४६,०७० रुपये •             संदीप लक्ष्मण गवळी  = १,५६,५९० रुपये •             विष्णू सखाराम चोपडे = १,४०,४१० रुपये •             भगवत नारायण इंगळे = १,४६,६५० रुपये •             आनंद जी. = ६८,८६३ रुपये •             ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = ४३,६२२ रुपये

दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी-ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन पुनर्निमाण सोशल फाऊंडेशनच्या वतीने...

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह विविध पक्षांचा पाठिंबा; पेपरफुटी, निकालातील...

भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत

विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ञांना सहभागी होण्याचे...