परदेशी पाहुण्यांची माहिती देण्यास विलंब; पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट, शेरटन ग्रँडवर गुन्हा

Date:

जेडब्ल्यू मेरियटकडून तब्बल ९४७ तास, तर शेरटन ग्रँडकडून ३३७ तास उशिरा माहिती; पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची कारवाई

पुणे : हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांची माहिती निर्धारित वेळेत पोलिसांना न दिल्याप्रकरणी पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट आणि शेरटन ग्रँड या दोन पंचतारांकित हॉटेलांच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.

पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी शहरातील हॉटेल, लॉज, घरमालक तसेच इतर आस्थापनांना त्यांच्याकडे वास्तव्यास येणाऱ्या परदेशी नागरिकांसह भाडेकरूंची माहिती निर्धारित मुदतीत पोलिसांना देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन होत आहे की नाही, याची शहरभर तपासणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

याच मोहिमेअंतर्गत पंचतारांकित हॉटेलांच्या नोंदी तपासण्यात आल्या. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये इटलीचे नागरिक ख्रिश्चन हुबेर ७ जून २०२६ रोजी वास्तव्यास आले होते. मात्र, त्यांच्या आगमनाची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने १७ जुलै रोजी पोलिसांकडे नोंदवली. ही माहिती तब्बल ३९ दिवस ११ तास म्हणजेच ९४७ तास उशिरा देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्याचप्रमाणे शेरटन ग्रँड हॉटेलमध्ये चीनचे नागरिक क्यू लुओ १४ जून २०२६ रोजी वास्तव्यास आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने २८ जून रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास नोंदवली. ही माहिती १४ दिवस एक तास म्हणजेच ३३७ तास उशिरा देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती निर्धारित वेळेत पोलिसांना देणे सुरक्षेच्या दृष्टीने बंधनकारक आहे. दोन्ही हॉटेल व्यवस्थापनांकडून निष्काळजीपणे या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून संबंधित प्रकरणांचा पुढील तपास चतु:शृंगी आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यांकडून पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दहीहंडीच्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू

जुनी सांगवीतील घटना; कार्यक्रम संपल्यानंतर कमान उतरवताना अपघात, सांगवी...

चाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणी

वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे...