पुणे रेल्वेचा १५ दिवसांचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलणार

Date:

हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम; १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान प्रवाशांना फटका

पुणे : हडपसर ते घोरपडी कोच मेंटनन्स कॉम्प्लेक्स (जीसीएमसी) दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार असून, पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

या ब्लॉकमुळे ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार असून, २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक गाड्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवरून सुरू किंवा समाप्त केल्या जाणार आहेत.

रेल्वेच्या नियोजनानुसार १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत पुणे-हडपसर मार्गावरील अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरपासून ब्लॉकचा कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल.

३ ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल. तर ४ ऑक्टोबर हा मुख्य कामाचा दिवस असून, हडपसर–जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेची कामे केली जाणार आहेत.

९८ फेऱ्या रद्द; शेकडो फेऱ्यांवर परिणाम

या कामामुळे रद्द करण्यात येणाऱ्या ४२ गाड्यांच्या ९८ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. २५ गाड्यांचे मार्ग बदलल्यामुळे ३६ फेऱ्या प्रभावित होतील.

तसेच ३५ गाड्यांच्या ९९ फेऱ्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर अल्प समाप्त किंवा अल्प प्रारंभ करण्यात येणार आहेत. याशिवाय २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन, तर १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई आणि पुणे-हावडा मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्यांना या ब्लॉकचा फटका बसणार आहे.

ब्लॉकचा काही कालावधी गणेशोत्सवाच्या काळात येत असल्याने पुणे विभागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडी रद्द आहे का, मार्ग बदलला आहे का किंवा वेळापत्रकात बदल झाला आहे का, याची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे.

दरम्यान, तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डीजेच्या आवाजामुळे सणाचे गांभीर्य जाते; बापटांवरील हल्ला लोकशाहीवर हल्ला : शरद पवार

“डीजे मुक्तीसारखे निर्णय घेण्याची गरज”; पुणे पोलिस आणि राज्य...

नागपुरात ‘डॉल्बी’च्या दणदणाटाला लगाम; मल्टीलेयर साऊंड सिस्टिमवर कडक निर्बंध

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा आदेश; ३ सप्टेंबर...

एमपीएससी पेपरफुटीची उच्चस्तरीय ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हे

आरोपींचे कॉल रेकॉर्ड, बदललेले मोबाईल, आर्थिक व्यवहार आणि इतर...

हडपसरकरांवर अजून किती कचरा लादणार? प्रशांत जगतापांचा सवाल

रामटेकडीतील कचरा प्रकल्पाला विनानिविदा २० वर्षांची मुदतवाढ; १४ विरुद्ध...