पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच, मीटरप्रमाणे भाडे आकारणाऱ्या आणि प्रवाशांना न नाकारणाऱ्या चांगले काम करणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम बुधवारी (दि. २७ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील स्थानक परिसरात आयोजित करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रिक्षा चालक युनियन (एन) सावधान या संघटनेतर्फे आयोजित या कार्यक्रमात पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रिक्षाचालकांचा गौरव करण्यात आला. मीटरप्रमाणे भाडे घेणारे, प्रवाशांना न नाकारणारे आणि जबाबदारीने सेवा देणारे रिक्षाचालक समाजासमोर आदर्श ठरत असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असल्याने वाहतूक शिस्त पाळणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. रिक्षाचालकांनी प्रवाशांशी योग्य वर्तन ठेवावे, मीटरनुसारच भाडे घ्यावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई आणि चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान, असा स्पष्ट संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पुणे रेल्वे स्थानक रेल्वे पोलीस अधिकारी प्रमोद खोपिकर, पुणे रिक्षा चालक युनियन (एन) सावधानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, विठ्ठल गायकवाड, शिवराज माळवदकर यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, प्रवासी आणि नागरिक उपस्थित हो

