पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन

Date:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 6 हजारांहून अधिक सायकलस्वारांचा सहभाग अपेक्षित

पुणे, 27 ऑगस्ट 2026: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर वर्षी “पुणे ऑन पेडल्स” ही सायकल रॅली आयोजित केली जाते. यावर्षी सर्वांच्या सोयीसाठी हा उपक्रम 13 सप्टेंबर 2026 रविवार सकाळी 6.00 वाजता संपन्न होणार आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की,
सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही सहा हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे.”

सायकल रॅलीचा मार्ग :
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
मार्ग : कर्वे रोड – गुडलक चौक मार्गे वळून डेक्कन जिमखाना बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज
पुतळा, खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वेरोड मार्गे परत

फॅमेली वॉकेथॉन / चालणे (वॉकिंग / रनिंग):
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
मार्ग : कर्वे रोड – नळ स्टॉप वळण कर्वे रोड मार्गे परत

या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या विद्यार्थ्यांना सायकल रॅली व फॅमेली वॉकेथॉन साठी नोंदणी करावयास सांगावे व आपली संख्या कळवावी ही विनंती. सहभागींनी स्वत: ची सायकल व पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी. सायकल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच शिक्षकांना ‘चालण्याच्या उपक्रमात’ (वॉकेथॉन मध्ये) सहभागी होता येईल. यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिका सज्ज

पुणे-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने व्यापक...

म्युझिक अँड मिरॅकल्स’मधून केदार मोरे यांच्या कॅन्सर उपचारासाठी होणार निधी संकलनाचा प्रयत्न

६ सप्टेंबरला गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात...

मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : पुणे शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी...

नेपाळ दुर्घटनेतील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकार ‘अलर्ट’; केंद्राशी समन्वयातून बचावाची तयारी

फडणवीसांचा अडकलेल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलवर संवाद; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी...