महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना  राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

Date:

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान

मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२६: महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेचा ‘एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती येथे शुक्रवारी (दि. २१) राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे अमरावती येथे शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर विचारमंथन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘आयईआय’च्या वतीने जाहीर झालेला ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना महसूलमंत्री श्री. चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रवीण पोटे, आमदार श्री. प्रवीण तायडे, ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’चे (भारत) अध्यक्ष श्री. मनिष कोठारी, पदाधिकारी श्री. आनंद जवंजाळ, श्री. राम विघे, श्री. आर. आर. तंवर, श्री. सुनील राठी आदींची उपस्थिती होती.

‘अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि मानवी प्रगतीचे शिलेदार आहेत. भारताच्या अभियंत्यांनी अफाट कौशल्याच्या जोरावर जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते भारतात आहेत. विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांची अद्भूत कार्यक्षमता ऊर्जामंत्री म्हणून काम करताना मी जवळून अनुभवली आहे. एलिफंटा बेटासारख्या दुर्गम ठिकाणी समुद्रामधून भूमिगत वाहिनीद्वारे वीज पोहोचवण्याचे अशक्यप्राय आव्हान महावितरण व महापारेषणच्या अभियंत्यांनी लिलया पेलले. हा प्रकल्प म्हणजे भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे!’ अशा शब्दांत महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियंत्यांचा सन्मान केला. याआधीच्या सत्रात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी विकसित भारत २०४७ चे ऊर्जा उद्दिष्ट: आधुनिक ऊर्जा सुलभतेचा आराखडा आणि महाराष्ट्राची आघाडी’ या विषयावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. विद्युत क्षेत्रामधील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. राजेंद्र पवार यांचा या संस्थेकडून ‘एमिनेंट इंजिनियर’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोलिसांची ‘सुर्वेज हॉटेल’वर कारवाई; अवैध दारूसाठा जप्त, मॅनेजरसह मालक अटकेत

मुंबई-बंगळुरू महामार्गालगत सुतारवाडी येथे छापा; ६१ हजार २२० रुपयांची...

सीओईपी विद्यार्थिनीवर माफीसाठी दबाव, वडेट्टीवार यांची भाजपवर टीका:काँग्रेस कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप

पुणे-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थिनीवर...

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रभावी पाठपुरावा : डॉ. नीलम गोऱ्हे

आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांचा उल्लेख; ग्रामीण भागात ‘कम्युनिटी...