खड्डे बुजविण्यापासून स्वच्छतागृहांच्या देखभालीपर्यंत; महापालिका प्रशासनाला भिमाले यांचे निर्देश

Date:

आठवडाभरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश; गणेशोत्सवापूर्वी बंद स्वच्छतागृहे सुरू करण्याच्या सूचना; अपघातग्रस्त मुलाच्या कुटुंबाला मदतीबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्डे तसेच बंद असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले. रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर बुजवून एका आठवड्यात ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली असून, महापालिका आयुक्त स्वतः या कामावर वैयक्तिक लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर आगामी गणेशोत्सवापूर्वी शहरातील बंद सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्त करून नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर चांगल्या कंत्राटदारांची मदत घेऊन खड्डे बुजविण्याचे काम वेगाने पूर्ण करावे. अटी-शर्ती आणि प्रक्रियेत अनावश्यक वेळ न घालवता नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना भिमाले यांनी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, सूस-म्हाळुंगे रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दहा वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतही महापालिकेकडून कार्यवाही केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने गटनेत्यांची बैठक घेऊन संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भिमाले यांनी दिली.

गणेशोत्सवापूर्वी बंद स्वच्छतागृहे सुरू करा

शहरातील बंद असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करून आगामी गणेशोत्सवापूर्वी नागरिकांसाठी खुली करावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सुमारे सात हजार टॉयलेट सीट्स उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा, वीज, दरवाजे, नळ तसेच अन्य आवश्यक सुविधांमध्ये बिघाड झाल्याने काही स्वच्छतागृहे वापरासाठी बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

गणेशोत्सव तसेच सणासुदीच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिक व भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे बंद स्वच्छतागृहांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय यादी तयार करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच स्वच्छता, पाणी आणि वीजपुरवठा नियमित राहील, याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

महापालिकेकडून ‘स्मार्ट टॉयलेट’ तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. मात्र, नवीन सुविधा उभारण्याबरोबरच सध्या उपलब्ध असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा पूर्ण क्षमतेने वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे दुरुस्त करून कार्यान्वित करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव

स्वच्छतागृहे दुरुस्त केल्यानंतर पुन्हा काही दिवसांत ती बंद पडू नयेत, यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन नियोजन करावे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित आणि दर्जेदार देखभाल-दुरुस्ती होण्यासाठी किमान दोन वर्षांचा सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करून सादर करावा, असे निर्देश भिमाले यांनी दिले.

“सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. गणेशोत्सवापूर्वी बंद स्वच्छतागृहे दुरुस्त करून सुरू करावीत. भविष्यात स्वच्छतागृहे बंद राहू नयेत, यासाठी किमान दोन वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करावा,” असे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे ग्रँड टूरसाठी १३६ किमी रस्त्यांची तपासणी:रस्ते, पदपथांच्या दर्जासाठी ‘पेव्हटेक’ची सल्लागार म्हणून नियुक्ती

कामांच्या खर्चाच्या १.५ टक्के शुल्क पुणे- जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या...

सीमेवरील जवानांना पुण्यातून राखीचा स्नेहबंध,सीमेवर तैनात जवानांसाठी २१ हजार राख्या रवाना

पुणेः आपल्या घरातील भावाच्या मनगटावर राखी बांधताना देशाच्या सीमेवर...

‘निरोगी सखी राहील सुखी’ महापौर महिला आरोग्य अभियानाचा दुसरा टप्पा सुरू

महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा...