सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार परताव्याचा लाभ

Date:

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार सीओईपी प्रशासनाचा निर्णय

पुणे: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या शुल्क रचने संदर्भात विविध क्षेत्रातून आणि विद्यार्थ्यांकडून निवेदन प्राप्त झाले होते. सदर विषयासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मागणीप्रती असलेली संवेदनशीलता आणि उच्च व तंत्र शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची शासनाची भूमिका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात अपर सचिव श्री. रेड्डी आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काल मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या मागणीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद म्हणून या शैक्षणिक वर्षासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेशासाठी जाहीर केलेल्या सर्व शुल्क रचनेची फेररचना करावी, असे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले.

विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काच्या परताव्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विद्यापीठाने शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (एफआरए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारीत शुल्क रचना करावी, असे मार्गदर्शित व निर्देशित केले. (एफआरए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि मा. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शुल्क रचनेतील इतर शुल्क (Other Fee) हे शैक्षणिक शुल्कात (Tuition fees) समाविष्ट करावे, असे निर्देशित केले आहे.

या सुधारीत शुल्क रचनेमुळे इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ/NT), ईडब्ल्यूएस (EWS) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना (Girls students) शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोंदूगिरी व अंधश्रद्धाजन्य गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा राबवा : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

उदगीरमधील संशयित आंतरराज्यीय बाल तस्करीचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी पोलीस...

१२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश, राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर ‘महाज्योती’ची मोहोर

पुणे- बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि...