जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन

Date:

पुणे, दि. १८ : जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत हा उपक्रम होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येची वाढ आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.

याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’मध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी स्वतः सहभागी होणार आहेत. “जलसंधारणाची मोहीम लोकचळवळ म्हणून निर्माण व्हावी, यासाठी मी या अभियानामध्ये सहभागी होत आहे. तुम्हीही सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

“माती वाचवा, पाणी वाचवा आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा,” हा संदेश घेऊन नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. विशेषतः युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, विविध शासकीय विभाग, उद्योजक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

पावसाचे प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत मुरवणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र अधिक जलसमृद्ध करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.
त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे उपस्थित राहून ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनतेच्या कामात भाजपा नेत्यांनी घातला खोडा, पण सुनेत्रावाहिनी, पार्थ दादांकडून निधी मिळवू-बालवडकर

कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द-राजकीय...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुंबई,दि.१८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी...

‘‘राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमामुळे युवकांचा आत्मविश्वास बळकट होणार.’’— दीप्ती चवधरी

                                      पुणे-    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात...