मुंढव्यात ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

Date:

पुणे महापालिकेची पहाटे कारवाई; नव्याने समाविष्ट गावांतील नागरिकांना अनधिकृत प्लॉटिंगपासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने मुंढवा परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचे आरसीसी अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पृथ्वीनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८४/६ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीन चांदणे, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल गुलेचा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. ५ जेसीबी, ४ गॅस कटर, ४ ब्रेकर, कॉम्प्रेसर तसेच मोठ्या मनुष्यबळाच्या मदतीने अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

महापालिकेने विशेषतः नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. महापालिकेचा विकास आराखडा (डीपी) मंजूर नसलेल्या किंवा बेकायदेशीर प्लॉटिंगमधील भूखंड खरेदी करून त्यावर अनधिकृत बांधकाम करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

छायाचित्रातही महापालिकेच्या यंत्राद्वारे बहुमजली आरसीसी बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

७५ कोटींच्या खड्डे दुरुस्ती निविदा रद्द केल्याबद्दल आयुक्तांचे आभार; अपात्र ठेकेदारांची EMD जप्त करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप; ‘बी’ पाकीट उघडण्यासाठी कालमर्यादा...

शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे, दि.१२: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील शासकीय...

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना वितरित

याद्या तपासून घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि....

कोंढव्यात ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रयाचा आरोप; व्यवस्थापकाला अटक, तीन महिलांची सुटका

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा; बी. जी. लोणकर रोडवरील...