अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना वितरित

Date:

याद्या तपासून घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

पुणे, दि. १२: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार (ASDD) मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांनी तपासून घ्याव्यात. चुकीने एखाद्या मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले असल्यास दुरुस्ती करुन घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांना अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांच्या याद्या वितरित करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी म्हणाले,
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावरही प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत 17 ऑगस्ट पर्यंत मुदत असून प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना रोजचे उद्दिष्ट ठरवून याद्या तपासून घ्याव्यात. अडचणी असल्यास बीएलओ यांची मदत घ्यावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे ,(बीएलओ) नाव व संपर्क क्रमांकाची यादी संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. हरकतींवर सुनावण्या झाल्यानंतर काही नावे यादीत समाविष्ट होतील.

ते म्हणाले, राजकीय पक्षांनी प्रतिनिधींकडून यादी तपासल्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. राजकीय पक्षांच्या मदतीने कमीत कमी हरकती प्राप्त होतील आणि जास्तीत जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट होऊन मतदार नोंदणीची टक्केवारी वाढेल, असा विश्वास श्री.डुडी यांनी व्यक्त केला.

बैठकीला नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित राजकीय पक्षांना एएसडीडी याद्यांच्या पेनड्राईव्हसह छापील प्रती देण्यात आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

७५ कोटींच्या खड्डे दुरुस्ती निविदा रद्द केल्याबद्दल आयुक्तांचे आभार; अपात्र ठेकेदारांची EMD जप्त करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप; ‘बी’ पाकीट उघडण्यासाठी कालमर्यादा...

मुंढव्यात ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

पुणे महापालिकेची पहाटे कारवाई; नव्याने समाविष्ट गावांतील नागरिकांना अनधिकृत...

शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे, दि.१२: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील शासकीय...

कोंढव्यात ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रयाचा आरोप; व्यवस्थापकाला अटक, तीन महिलांची सुटका

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा; बी. जी. लोणकर रोडवरील...