घरातील ध्वनी प्रदूषणाकडेलक्ष देण्याची गरज- देवेंद्र भुजबळ

Date:

पुणे-आपल्या घरात मिक्सर, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लिनर आदी उपकरणांच्या कर्कश्श आवाजामुळे जेध्वनी प्रदूषण होत असते, त्याकडे लक्ष देण्याची गरजआहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते पुणे येथील निसर्गसेवक संस्थेने नुकत्याच आयोजित केलेल्या
“कर्णकर्कश आवाज – कायदा- आरोग्य आणि आपण” या विषयावरच्या चर्चा सत्रात भाग घेताना बोलत होते.

श्री देवेंद्र भुजबळ यांनीजेष्ठ श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके, पर्यावरण विषयातील कायदेतज्ज्ञ अमोघ परळीकर, आणि प्रा. महेश शिंदीकर यांनी व्यक्त केलेली मते , अनुभव हे धार्मिक सण समारंभ, शुभ कार्ये या दरम्यान होणारे ध्वनि प्रदूषण, नवीन इमारतींच्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण
या पुरतेच मर्यादित असल्याचे निदर्शनास आणून देऊन श्री देवेंद्र भुजबळ यांनी घराबाहेरील प्रदूषण हे प्रासंगिक असते तर घरातील उपकरणांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे सातत्याने होत असल्यामुळे त्याचा घरातील व्यक्तींवर काय दुष्परिणाम होतो, तो कसा रोखता येईल, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

श्री भुजबळ यांच्या मताशी सहमती दर्शवित एका गृहिणीने मिक्सर वापरताना, त्याच्या आवाजाचा किती त्रास होतो ते सांगितले. तर
दुसर्‍या एका व्यक्तीने एक प्रसिद्ध प्रवचनकार घरातील पंख्याच्या आवाजामुळे झोपू शकत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, झोपताना गाणी लावून ती ऐकत झोपतात,असे सांगितले. तर आणखी एका व्यक्तीने आजकालची मुले, मुली सारखा हेड फोन लावून मोबाईल वरील गाणी, कार्यक्रम ऐकत असल्यामुळे त्यांना तरुण वयात होऊ लागलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले.

चर्चासत्राचे प्रास्ताविकनिसर्गसेवक संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले. तर चर्चासत्राचे संचालनमाधवी दाबक यांनी केले.

या चर्चासत्रास विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव

काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती प्रदान ⁠सलग...

पदाधिकारी-नगरसेवकांमध्ये समन्वय वाढवणार; सर्वांच्या प्रश्नांवर तोडगा काढू : मुरलीधर मोहोळ

१२६ नगरसेवकांशी संवादानंतर मोहोळ माध्यमांसमोर; महापौर, सभागृह नेते आणि...

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए....