संशोधन आधारित उपक्रम व विद्यार्थी केंद्री शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य-कुलगुरु डॉ. व्यंकट गिते
नाशिक: – आरोग्य शिक्षणात संशोधनावर आधारित उपक्रम, पारदर्शक प्रशासकीय कामकाज व विद्यार्थी केंद्री कामांना सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे नवनियुक्त मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ विद्यापीठात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते समवेत मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अजित फुंदे, डॉ. श्रीचक्रधर मुंघल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अनिता गिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे नवनियुक्त मा. कुलगुरु डॉ. व्यकंट गिते यांनी सांगितले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा, तंत्रज्ञान आधारित शिक्षण प्रणालीचा वापर व्हावा यासाठी प्रयत्नशिल राहिल. विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन होणे गरजेचे आहे त्यासाठी संशोधक विद्यार्थी यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच संशोधना प्राधान्य मिळावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. आरोग्य शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य आत्मसात करण्यासाठी विविध प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील जेणेकरुन डॉक्टर व रुग्णांमधील संवाद सुकर होईल. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय मानांकनात पहिल्या शंभर विद्यापीठाच्या यादी स्थान मिळावे यासाठी विविध संशोधन, समाजोपयोगी आरोग्य जनजागृती उपक्रम व ‘नॅक’ च्या धर्तीवर गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात सिंगल विन्डो सिस्टम प्रणाली लागू करण्यात येईल ज्याव्दारा विद्यार्थी आपल्या समस्या मांडू शकतील. व्ही.सी. पोर्टल कार्यान्वीत करुन त्याव्दारा ऑनलाईन तक्रारींचा निपटारा करण्यात येईल. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येईल. कॉन्फीडन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनवर अधिक भर देण्यात येईल. शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जदार करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व अभ्यागतांना विविध प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील.
आय.आय.टी., इस्त्रो, स्पोर्ट इंस्टिटयुट ऑफ सायन्स सारख्या नामांकित संस्थांसमवेत करार करुन आरोग्य शिक्षण प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी भर देण्यात येईल. आरोग्य शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यान्वीत आहेत त्याव्दारा विद्यापीठाला निधी मिळावा जेणेकरुन अधिक सक्षम व गुणवत्तपुर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ भरारी घेईल. नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या मदतीने आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम, आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा, मोटर-सायकल अॅम्ब्युलन्स सर्व्हिस यासारखे उपक्रम राबवून समाजोपयोगी काम करण्यातसाठी विद्यार्थ्यांना प्ररित करण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही तंत्रज्ञान व कौशल्याधिष्टीत उपक्रमांसाठी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यासाठी योग्य व्यवस्थापन व मार्गदर्शन मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. विद्यापीठाकडून ई-क्लासरुम सुरु केल्यास एकाच वेळी हजारो विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन घेतील त्याचा भविष्यात मोठा उपयोग होईल. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी ‘टेलिमानस’ योजनेचा प्रभावी अवलंब करण्यात येईल. विद्यापीठ ही विद्यार्थ्यांची स्वप्न घडवणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचा भाग म्हणून प्रत्येकाने प्रामाणिक, तत्परता व नियोजनबब्ध पध्दतीने काम केल्यास येणाÚया काळात विद्यापीठ नव्या उंचीवर नेऊ असे त्यांनी सांगितले.
यावेळी मा. कुलगुरु यांच्या मातोश्री श्रीमती शाहुबाई अर्जुनराव गिते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा. कुलगुरु यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता गिते, बंधू भास्कर गिते यांचा विद्यापीठाकडून सत्कार करण्यात आला.
कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांना ज्ञानदान करणारे व आदर्श व्यक्तीमत्व घडविण्यासाठी मूलमंत्र त्यांचे देणारे त्यांचे आदरणीय शिक्षक व गुरुजनांना सत्कार यावेळी करण्यात आला. डॉ. पुरुषोत्तम दराख, डॉ. श्रीराम कंडी, डॉ. अनुराधा कंडी, डॉ. जे.एस. कंडी, डॉ. मलीक, डॉ. गौरांग शहा, डॉ. पळनीटकर, डॉ. एन.डी.कुलकर्णी, डॉ. पंकज माहेश्वरी, डॉ. प्रविण कुमार वसाडीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. किरण पाटोळे, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. गणेश जाधव, डॉ. सचिन देवरे, डॉ. अनिल सानप, डॉ. अशोक थोरात आदी गुरुजनांचा मा. कुलगुरु यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नाशिक ग्रामिणचे पालीस अधिक्षक डॉ. डी.एस. स्वामी, विद्यापीठ शैक्षणिक कक्षाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव, एम.पी.आय.चे डीन डॉ. किरण पाटोळे, नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप गुंडरे, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. पळनीटकर, डॉ. गौरांग शहा, डॉ. प्रविण कुमार वसाडीकर, डॉ. एन.डी. कुलकर्णी, डॉ. अजय बोराळकर, श्री. आबाजी शिंदे, श्री. संदीप महाजन, श्री. संदीप राठोड, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. परचंडेकर, डॉ. अशोक थोरात, डॉ. अजित फुंदे, डॉ. पंकज माहेश्वरी, श्रीमती सुनिता चांदोरकर, अॅड. शिवाजी मोरे, डॉ. स्वप्नाली कदम, श्री. भास्कर गिते, डॉ. श्रीचक्रधर मुंघल यांनी यावेही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव श्री. विजय उकलगांवकर, नाशिक ग्रामिणचे पालीस अधिक्षक डॉ. डी.एस. स्वामी, मा. उद्योग मंत्री यांचे सचिव डॉ. प्रशांत रुमाले, श्री. अरविंद केंद्र, डॉ. अजय भांडारवार, डॉ. मिनल मोहगांवकर, डॉ. नागोबा, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. चक्रधर मुंगल, डॉ. किशोर वाणी, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अरविंद केंद्रे, श्री. विजय उकडगावकर, डॉ. विनायक आघाव, श्री. संजय शेरकर, डॉ. गौरांग शहा,, डॉ. अशोक थोरात, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अजित फुंदे, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अरविंद केंद्रे, डॉ. संतोष केंद्रे, श्री. शैलेश चव्हाण, श्री. सुधीर चौधरी, डॉ. आशिष छाजेड, डॉ. प्रशांत दराडे, डॉ. परचंडेकर, श्री. बाबुराव केंद्रे, डॉ. अनंत शिनगारे, डॉ. दिनकर केकाण, डॉ. शरद घावटे, डॉ. अन्सारी, डॉ. विनायक आघाव, श्री. प्रदीप केंद्रे, श्री. भाऊसाहेब मुंडे, डॉ. प्रविणकुमार वासाडीकर, डॉ. स्वप्नाली कदम यांचा मा. कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी नवनियुक्त मा. कुलगुरु यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलसचिव यांनी विद्यापीठाचा मानदंड नवनियुक्त मा. कुलगुरु डॉ. व्यकंट गिते यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच आभार श्री. देवेंद्र पाटील यांनी मानले.
यावेळी विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरुंचे अभिनंदन केले तसेच मनोगतातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित रहावे.

