होय… MH 12 च; पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी गडकरींची सकारात्मक ग्वाही – मुरलीधर मोहोळ

Date:

  • MH 12 कोड बदलू नये यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नितीन गडकरींकडे मागणी

नवी दिल्ली : पुणे शहराची ओळख बनलेला ‘MH 12’ हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वाहन नोंदणी कोड कायम ठेवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी MH 12 कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातील,अशी सकारात्मक ग्वाही दिल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे आरटीओमध्ये नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी सध्या ‘MH 12 ZZ’ ही मालिका सुरू आहे. ही विद्यमान मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा आरटीओ कोड MH 12 बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पुणेकरांमध्येही याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.पुणेकरांच्या भावना आणि शहराची ओळख लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्याची ओळख बनलेला MH 12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, तसेच त्याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली.या मागणीला नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

MH 12 हा कोड कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.गडकरी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे पुण्याची ओळख जपणारा MH 12 हा वाहन नोंदणी कोड कायम राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. पुढील पर्यायी नोंदणी मालिका कोणती असेल, याबाबत आता संबंधित विभागाच्या अधिकृत निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही ‘गणेशोत्सव...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...