तीन वर्षांच्या हरवलेल्या चिमुकलीचा अवघ्या तासाभरात शोध

Date:

३८ पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने परिसर पिंजून काढला; कर्वेनगरमधील बिजली तालीम चौकात मुलगी सुखरूप आढळली

पुणे : वारजे परिसरातून हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा वारजे पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोध घेऊन तिला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) घडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच मुलगी सुरक्षित मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांची मुलगी सकाळी नऊच्या सुमारास वडारवस्ती परिसरात इतर मुलांसोबत खेळत होती. खेळता-खेळता ती परिसरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने दुपारी एकच्या सुमारास वारजे पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांना माहिती देण्यात आली. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि अंमलदारांची स्वतंत्र शोधपथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी वडारवस्ती, कर्वेनगर आणि आजूबाजूचा परिसर पायी फिरून तपासला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. नागरिक, पोलीस मित्र आणि गुप्त बातमीदारांनाही मुलीची माहिती देण्यात आली. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातूनही मुलीचा फोटो आणि माहिती प्रसारित करण्यात आली.

मुलीचा माग काढत पोलीस दुपारी दोनच्या सुमारास कर्वेनगरमधील बिजली तालीम चौकात पोहोचले. तेथे मुलगी एका महिलेजवळ सुखरूप बसलेली आढळली. संबंधित महिलेने मुलगी एकटीच रस्ता ओलांडताना दिसल्याने तिला सुरक्षिततेसाठी स्वतःजवळ थांबवून ठेवल्याचे सांगितले. मुलगी लहान असल्यामुळे तिला स्वतःचे नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता. पाऊस कमी झाल्यानंतर तिला पोलीस चौकीत घेऊन जाण्याचा विचार महिलेने केला होता.

पोलिसांनी खात्री केल्यानंतर मुलीला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या शोधमोहिमेत वारजे पोलीस ठाण्यातील तीन पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक आणि ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

पुणे.दि.३: महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व व रील स्पर्धांचा शुभारंभ

'बाजीराव पेशवे सन्मानचिन्हाचे' अनावरण; इतिहास संवर्धनासाठी युवकांच्या सहभागावर भर पुणे,...

पुणे विमानतळावरून नवीन उड्डाणांना प्राधान्य,वाढीव स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर करणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे (प्रतिनिधी)भारतीय हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे...

जमीन मालकाची २ कोटी ६४ लाखांची फसवणूक, बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या...