पूरग्रस्त राज्यांना 2,117 कोटींचा निधी मंजूर, महाराष्ट्राला मिळणार 500 कोटी रुपये

Date:

नवी दिल्ली- केंद्रीय गृह आणि  सहकारमंत्री अमित शाह यांनी या वर्षीच्या मोसमी पावसाच्या(मान्सून) हंगामात पूरग्रस्त झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधील केंद्राच्या वाट्यातून ₹2,117.85 कोटींचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. यामध्ये  महाराष्ट्रासाठी  500 कोटी रुपये  आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास वचनबद्ध असून परिस्थितीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवत आहे.

मान्सून सुरू झाल्यापासून भारत सरकार राज्य सरकारांच्या समन्वयाने पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारने आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांची पूर्वतयारी म्हणून तैनाती तसेच संरक्षण मंत्रालयामार्फत आवश्यक रसद सहाय्यासह सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली आहे.

नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके (आयएमसीटी) अरुणाचल प्रदेश आणि आसाम येथे आधीच पाठविण्यात आली आहेत. पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन आसाममध्ये  आयएमसीटीने दोन दौरे केले आहेत. नागालँड सरकारच्या विनंतीनुसार त्या राज्यासाठीही एक आयएमसीटी  स्थापन करण्यात येत आहे.

पूरग्रस्त सात राज्यांपैकी हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि नागालँड या राज्यांना आर्थिक वर्ष 2026-27 साठी एसडीआरएफचा पहिला हप्ता आधीच वितरित करण्यात आला आहे. मदतकार्यांसाठी निधी वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना केंद्राच्या वाट्यातील एसडीआरएफचा दुसरा हप्ता आगाऊ स्वरूपात वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, मदतकार्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्याची गरज लक्षात घेऊन, लागू मार्गदर्शक तत्त्वांमधील कागदपत्रांच्या अटींमध्ये शिथिलता देत अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना केंद्राच्या वाट्यातील एसडीआरएफच्या पहिल्या हप्त्याचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यासाठी २५ टीएमसी पाण्याची मागणी; महापौर मंजुषा नागपुरेंची जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा

धायरीतील दोन पुलांना तातडीने एनओसी, मुळा-मुठा पुनरुज्जीवन मिशन आणि...

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

बारामती, दि.२: महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या...

नैसर्गिक हिऱ्यांइतकीच दुर्मीळ मैत्री; डी बिअर्सची ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ मोहीम

फ्रेंडशिप डेनिमित्त नऊ शहरांतील ६० स्टोअर्समध्ये खास अनुभव; पुण्याचाही...

 हाताने मैला साफ करणारी एकही व्यक्ती आढळली नसल्याची केंद्र सरकारची माहिती

मुंबई-हाताने मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्याबरोबरच सांडपाणी...