गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू- सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार

Date:

पुणे : पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आश्वासित केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात अॅड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, कलाकार अथर्व सुधामे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवातील सहभागिता, सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी, देखावे आणि परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. जगात अशा व्यापक स्वरूपाचा उत्सव अन्यत्र आढळणे कठीण आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, असे अॅड. शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या घरगुती व सार्वजनिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा आणि आठवणी bappa.org या व्यासपीठावर नागरिकांनी शेअर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचविण्यासोबतच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यतेसाठी आवश्यक असलेले सांस्कृतिक दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘फोक लोक’ या कार्यक्रमांतील कलाकारांचे अॅड. शेलार यांनी अभिनंदन केले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी अॅड. शेलार यांचे अभिनंदन केले.

bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून गणेशोत्सवातील संस्कृती, परंपरा आणि कला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा, आठवणी आणि कलाविष्कार या व्यासपीठावर नोंदवावेत, असे आवाहन श्रीपाद अष्टेकर यांनी केले.

यावेळी नागरिक, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचा गणेशोत्सव पाहून मन भरून आले; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून परंपरेचे कौतुक

मानाच्या गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन; डीजे,...

मोठ्या इमारतींनी नव्हे तर कला-संस्कृतीच्या जतनाने शहराचा विकास : उपराष्ट्रपती राधाकृष्णन

३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन- ज्येष्ठ अभिनेते मोहन...

महिला सुरक्षेसाठी कडक कायद्यांसोबत जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य : डॉ. नीलम गोऱ्हे

दिल्ली प्रकरणी तातडीच्या न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री...