फ्रेंडशिप डेनिमित्त नऊ शहरांतील ६० स्टोअर्समध्ये खास अनुभव; पुण्याचाही समावेश
पुणे : आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा गौरव करण्यासाठी डी बिअर्स इंडियाने फ्रेंडशिप डेनिमित्त ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ ही विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत जिवलग मित्र-मैत्रिणींसाठी नैसर्गिक हिऱ्यांच्या खास ब्रेसलेट संग्रहासह विविध इन-स्टोअर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पुणे, कानपूर, कोची, कोईमतूर आणि नागपूर या नऊ शहरांतील फॉरेव्हरमार्क डायमंड ज्वेलरी स्टोअर्ससह ६० भागीदार स्टोअर्समध्ये १ आणि २ ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘बेस्टी ब्रेसलेट कलेक्शन’मध्ये नैसर्गिक हिऱ्यांच्या चार खास डिझाइन्सचा समावेश आहे. ही ब्रेसलेट्स विशेषतः जोडीने परिधान करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. सामायिक आठवणी आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून या डिझाइन्सची निर्मिती करण्यात आली आहे.
या संग्रहात बॅगेट आणि गोलाकार हिऱ्यांचा वापर करून मॉर्स कोडमध्ये ‘BFF’ दर्शविणारी सिग्नेचर डिझाइन आहे. तसेच एकमेकांत गुंफलेली आणि वेगवेगळी वर्तुळाकार डिझाइन्सही आहेत. ही दोन्ही ब्रेसलेट्स एकत्र आल्यावर संपूर्ण आकृती तयार होते.
स्टोअरमध्ये आलेल्या प्रत्येक जिवलग मित्र-मैत्रिणीच्या जोडीसाठी तीन टप्प्यांमध्ये विशेष अनुभवाचे आयोजन करण्यात आले. ‘बॉण्ड टुगेदर’मध्ये एक्स्प्रेस नेल-आर्ट, ‘क्रिएट टुगेदर’मध्ये एकमेकांसाठी बॅग चार्म तयार करण्याची संधी, तर ‘कॅप्चर फॉरेव्हर’मध्ये विविध प्रॉप्ससह फोटोशूट आणि ‘बेस्टी कॉन्ट्रॅक्ट’वर स्वाक्षरी करण्याचा समावेश होता.
डी बिअर्स इंडियाचे कॅटेगरी मार्केटिंग कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाले की, खरी मैत्री निर्माण करता येत नाही, ती नैसर्गिकरीत्या फुलत जाते. ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ मोहिमेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आयुष्यभराच्या मैत्रीचा सन्मान करण्यासाठी या मोहिमेने अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
ब्रेसलेट्सच्या बारकाईने तयार केलेल्या डिझाइन्सपासून ते स्टोअर्समधील विशेष अनुभवांपर्यंत प्रत्येक बाब नैसर्गिक हिऱ्याप्रमाणेच चिरंतन आणि अस्सल नात्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

